इंस्टाग्रामची रिच लिस्ट 2019 नुकतीच जाहीर झाली आहे. त्यात 100 लोकांचा समावेश असून, त्यात सेलिब्रिटी, फॅशन, फूड, लाइफस्टाइल, स्पोर्ट्स, ट्रॅव्हल या वेगवेगळ्या प्रकारातील व्यक्ती आहेत. खेळाच्या सेक्शनमध्ये दहा खेळाडूंचा समावेश असून, त्यात पोर्तुगालचा कॅप्टन ख्रिस्तीयानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोचे 17 कोटी 28 लाख फॉलोअर्स आहेत. त्याला एका पोस्टसाठी जवळपास साडे सहा कोटी रुपये मिळतात.