Avani Lekharaने Tokyo Paralympicsमध्ये रचला इतिहास, पटकावले दुसरे पदक

अवनी लेखरा हिने २०२० च्या पॅरालिम्पिकमध्ये आपले दुसरे पदक जिंकले  तिने महिलांच्या ५० मीटर रायफल 3P SH1 च्या अंतिम फेरीत कांस्य जिंकले. तिने यापूर्वी 10 मीटर एअर रायफल SH1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

avani lekhara bags bronze in 50m rifle 3p sh1
अवनी लेखराची ऐतिहासिक कामगिरी, जिकले कांस्य 
थोडं पण कामाचं
  • अवनी लेखराने 2020 च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 50 मीटर रायफल 3P SH1 फायनलमध्ये कांस्यपदक पटकावले
  • यापूर्वी तिने 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते
  • अवनी एकाच पॅरा गेम्समध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय ठरली

टोकियो : भारताची सुवर्ण कन्या अवनी लेखारा ही एकाच पॅरा गेम्समध्ये दोन वेगवेगळी पदके जिंकणारी देशातील पहिली पॅरालिम्पियन ठरली आहे. तिने महिलांच्या 50 मीटर रायफल 3P SH1 च्या अंतिम फेरीत कांस्यपदक मिळवले. लेखरा हिने यापूर्वी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. (avani lekhara bags bronze in 50m rifle 3p sh1 becomes first indian to win twin medals in same paralympics)

स्टँडिंग पोझिशनमध्ये 15 शॉट्सनंतर अवनीने एकूण 149.5 गुण मिळवले ज्यामुळे तिने चार्टवर चौथा क्रमांक मिळवला. प्रोन स्थितीत, अवनीने एकूण 149.5 मिळवण्यासाठी 50.8, 50.3 आणि 48.4 या तीन मालिका नोंदवल्या. स्कोअर तिच्या एकूण क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी