BCCI अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल 

Sourav Ganguly admitted to hospital: बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Sourav Ganguly
सौरव गांगुली (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI
थोडं पण कामाचं
  • सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली 
  • छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल 
  • वूडलँड्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

कोलकाता : टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष (BCCI President Sourav Ganguly) सौरव गांगुली यांना कोलकाता येथील वूडलँड्स रुग्णालयात (Woodland Hospital Kolkata) दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळच्या सुमारास छातीत दुखू लागल्यानंतर सौरव गांगुली यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माहिती दिली की, सौरव गांगुली यांच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. २४ तास देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात येणार आहे. तसेच योग्य ते उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली सकाळच्या सुमारास आपल्या घरी व्यायाम करत होते आणि त्याच दरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागले. यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. कोलकाता येथील वूडलँड्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल असं म्हटलं जात आहे.

सौरव गांगुली यांनी आपल्या क्रिकेट करिअरमध्ये एकूण ११३ टेस्ट मॅचेस, ३११ वन-डे आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळल्या आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ११३६३ रन्स आहेत तर टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी ७२१२ रन्स केले आहेत. इतकेच नाही तर वन-डे क्रिकेटमध्ये त्यांनी १०० विकेट्सही घेतल्या आहेत. ज्यामध्ये दोनवेळा पाच-पाच विकेट्सचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी