EXCLUSIVE VIDEO Arshdeep Singh mother Baljit Kaur reacts after trolls slam her son for Team India Loss against Pakistan : आशिया कप टी २० क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. पाकिस्तान ही मॅच एक चेंडू आणि पाच विकेट राखून जिंकला. मॅचनंतर भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंह याने एक महत्त्वाचे वक्तव्य केले.
भन्नाट फीचर्सचा फोन ९९९० रुपयांत
ही Google Chrome एक्सेटेन्शन असतील रिमूव्ह करा
पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार?
भारत पाकिस्तान मॅच दरम्यान अठराव्या ओव्हरमध्ये रवी बिश्नोईच्या चेंडूवर असिफ अली याने फटका मारला. अर्शदीप झेल घेईल असे क्रिकेटप्रेमींना वाटत होते. पण अर्शदीपचा अंदाज चुकला आणि झेल सुटला. यानंतर थोड्या वेळात पाकिस्तानने मॅच जिंकली. अर्शदीपने कॅच घेतला असता तर पाकिस्तानवरील दबाव वाढला असता आणि भारताला विजयासाठी प्रयत्न करण्याची संधी उपलब्ध झाली असती, असे मत काही क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केले. तर काही ट्रोलरनी अर्शदीपच्या हातून कॅच सुटल्यानंतर या विषयाला भलतेच वळण देण्याचा प्रयत्न केला. अर्शदीपशी संबंधित विकिपीडिया वेबपेजवर दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच सायबर कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली. या सर्व घडामोडी घडत असतानाच अर्शदीपने केलेल्या महत्त्वाच्या वक्तव्याचे वृत्त आले.
सुपर फोर फेरीची मॅच अर्शदीपच्या आईने बघितली होती. ही मॅच झाल्यानंतर आई अर्शदीपला भेटली. दोघांनी रेस्टॉरंटमध्ये जेवण घेतले. यावेळी अर्शदीप म्हणाला खासगी आयुष्यात खेळाशी संबंधित विषय आणायचे नाही, खेळाशी संबंधित विषय मैदानापुरते मर्यादीत ठेवायचे. हे एवढे बोलणे झाल्यानंतर आईशी बोलताना अर्शदीपने खेळाच्या मुद्यावर चर्चा केली नाही. पण तो एकदम नॉर्मल होता. ही माहिती अर्शदीपच्या आईने मीडियाला दिली.