पाक-अफगाणिस्तानने Gentleman's game ला लाजवलं, मैदानात आणि स्टेडियममध्येही राडा

Asia Cup 2022: पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातील विजयानंतर संघाच्या समर्थकांनी स्टेडियममध्ये जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानातील काही प्रेक्षकांना हे आवडले नाही आणि त्यांनी स्टेडियममधील खुर्च्या काढून पाकिस्तानी प्रेक्षकांवर फेकण्यास सुरुवात केली.

When the ground was hit, the stadium was ransacked, the match between Pakistan and Afghanistan was dramatic, watch the video
अफगाणिस्तानने Gentleman's game ला लाजवलं, Pak च्या चाहत्यांना मारल्या खुर्च्या उखडून   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात पराभव पत्करावा लागला
  • असिफ अलीने अफगाणिस्तानच्या फरीदला धक्का दिला आणि बॅट दाखवली.
  • अफगाणिस्तानचे चाहते स्टेडियममध्येच पाकिस्तानी चाहत्यांवर तुटून पडले

Pakistan vs Afghanistan : आशिया चषक २०२२ मध्ये गुरुवारचा दिवस अतिशय लाजिरवाणा ठरला. मैदानापासून सुरू झालेली हा राडा स्टेडियमबाहेर पोहोचला. अफगाणिस्तानचे चाहते स्टेडियममध्येच पाकिस्तानी चाहत्यांवर तुटून पडले आणि पाकिस्तानी चाहत्यांना बेदम मारहाण केली. ही भांडण स्टेडियमबाहेर सुरू होण्यापूर्वी स्टेडियमच्या आतही जोरदार मारहाण झाली होती. अफगाण चाहत्यांनी स्टेडियमचेही नुकसान केले आणि या सगळ्याचे कारण आहे पाकिस्तानी खेळाडू आसिफ अलीचे लज्जास्पद कृत्य.

अधिक वाचा : Asia Cup 2022: VIDEO- मैदानातच भिडला पाकिस्तानी खेळाडू, बॉलरवर बॅट उगारली!

आसिफचे लज्जास्पद कृत्य

आसिफ फलंदाजी करत होता आणि अफगाणिस्तानचा खेळाडू फरीदच्या चेंडूवर आऊट होताच आसिफला इतका राग आला की तो मैदानावरच फरीदला मारायला गेला. त्यानंतर त्यानं बॅटही उगारण्याचा प्रयत्न केला. शारजाहमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने भलेही सामना जिंकला असेल, पण पाकिस्तानी खेळाडूने केलेल्या लाजिरवाण्या कृत्याने समोरच्या संघाला मान खाली घालावी लागली. आसिफच्या या कृत्यानंतर आयसीसी त्याच्यावर बंदीही घालू शकते.

अधिक वाचा : Asia Cup: अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तान काठावर पास, भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

शरमेने मान खाली

खरे तर आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात बुधवारी अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 129 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल शेवटच्या षटकात नसीम शाहने मारलेल्या सलग दोन षटकारांच्या जोरावर संघाने अखेरच्या षटकात मोठ्या कष्टाने विजयाचे लक्ष्य गाठले. हा सामना पाकिस्तानने जिंकला असेल, पण त्याच्या खेळाडूने केलेल्या लाजिरवाण्या कृत्याने समोरच्या संघाची मान शरमेने खाली आणली.

चाहत्यांकडून स्टेडियमची तोडफोड 

रोमहर्षक सामन्यातील पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांनी स्टेडियमची प्रचंड तोडफोड केली. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी क्वचितच पाहायला मिळतात. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही या घटनेचा निषेध करत भविष्यात असे होऊ नये असे आवाहन केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी