ट्रेंडिंग:

IPL 2023 फायनल मॅचपूर्वी आली मोठी बातमी, CSK च्या दिग्गज प्लेअरने जाहीर केली निवृत्ती

CSK vs GT IPL 2023 Final: आयपीएल 2023 ची फायनल मॅच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. मात्र, या मॅचपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे चेन्नईच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Updated May 28, 2023 | 06:56 PM IST

IPL 2023 फायनल मॅचपूर्वी आली मोठी बातमी, CSK च्या दिग्गज प्लेअरने जाहीर केली निवृत्ती
Ambati Rayudu Retirement from IPL: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023 मधील फायनल मॅच 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. मात्र, ही मॅच सुरू होण्यापूर्वी चेन्नईच्या टीममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईच्या टीमचा स्टार प्लेअर अंबाती रायडू याने आयपीएलमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. ही फायनल मॅच अंबाती रायडूची शेवटची मॅच असणार आहे.
अंबाती रायडू याने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "मुंबई आणि सीएसके या दोन ग्रेट टीम्ससाठी आयपीएल मॅचेस खेळलो. 204 मॅचेस, 14 सीझन, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. अपेक्षा आहे की आजच्या रात्री सहावी ट्रॉफी जिंकू."

37 वर्षीय अंबाती रायडू याने पुढे लिहिलं, "हा दीर्घ प्रवास झाला. मी ठरवलं आहे की, आज रात्रीची फायनल मॅच माझी आयपीएलमधील शेवटची मॅच असेल. मला ही ग्रेट टूर्नामेंट खेळताना खूप आनंद झाला, मजा आली. तुम्हा सर्वांचे आभार. आता कोणताही यू-टर्न नाही."

2019 मध्ये निवृत्ती आणि पुन्हा माघार

2019 मध्ये अंबाती रायडू याला 2019 वन-डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात जागा मिळाली नव्हती. त्याचं नाव स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले होते. तेव्हा अंबाती रायडूने नाराज होत जुलै 2019 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. मात्र, दोन महिन्यांनंतर त्याने आपली निवृत्ती मागे घेतली आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला ईमेल पाठवून पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. यापूर्वी 2018 मध्ये अंबाती रायडूने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

टीम इंडियासाठी 55 वन-डे मॅचेस

अंबाती रायडूने भारतासाठी खेळलेल्या 55 वन-डे मॅचेसमध्ये 47.05 च्या अ‍ॅव्हरेजने एकूण 1694 रन्स केले. त्याचा सर्वाधिक स्कोअर नॉट आऊट 124 रन्स इतकी होती. अंबाती रायडूने 3 सेंच्युरी आणि 10 हाफसेंच्युरी केल्या होत्या. अंबाती रायडूने 6 टी-20 मॅचेस सुद्धा खेळल्या आहेत. यामध्ये 10.50 च्या अ‍ॅव्हरेजने केवळ 42 रन्स केले. अंबाती रायडूच्या नावावर 97 फर्स्ट क्लास मॅचेस आहेत ज्यामध्ये 6151 रन्स आहेत.
ताज्या बातम्या

Vivo Price Drop: महिन्याभरात दुसऱ्यांदा स्वस्त झाले Vivo चे हे 2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Price Drop   Vivo  2

Rahu Ketu Gochar 2023: दिवाळीपूर्वी राहू-केतूचे मोठे संक्रमण, या 5 राशी होणार मालमाल

Rahu Ketu Gochar 2023 -  5

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay IIT -   10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths   7  4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

     Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited