CRICKET NEWS : राम बरन मेमोरिअल प्रिमिअर लीग 2023मध्ये डोंबिवलीच्या संघाचा 94 धावांनी विजय

मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या 14 वर्षांखालील मुलांच्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग 2023 स्पर्धेत डोंबिवलीच्या संघाने 94 धावांनी शानदार विजय संपादन केला आहे.

Updated May 25, 2023 | 05:40 PM IST

Cricket explained academy dombivali

क्रिकेट एक्सप्लेन अकादमी, डोंबिवली

मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या 14 वर्षांखालील मुलांच्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग 2023 स्पर्धेत डोंबिवलीच्या संघाने 94 धावांनी शानदार विजय संपादन केला आहे.
अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर 14 स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित करीत आहे. गेल्या वर्षाच्या शानदार यशानंतर 22 मे रोजी या स्पर्धेची सुरूवात झाली.
Man of the match Aarya sagare
मॅन ऑफ द मॅच आर्य सागरे
आझाद मैदानावर झालेल्या एकतर्फी सामन्यात क्रिकेट एक्सप्लेन अकादमी डोंबिवलीच्या संघाने स्पीड स्पोर्ट्स क्लब संघावर 94 धावांनी विजय मिळविला. पहिल्या फलंदाजी करताना क्रिकेट एक्सप्लेन अकादमी डोंबिवलीच्या संघाने संघाने निर्धारीत 40 षटकात 5 बाद 209 धावा केल्या. यात आयुष आंबेकर याच्या 96 चेंडूत 77 धावांचा मोलाचा वाटा आहे. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार लगावाले. क्रिकेट एक्सप्लेन अकादमी डोंबिवलीच्या संघाच्या 209 धावांचा पाठलाग करताना स्पीड स्पोर्ट्स क्लबचा संघ 28.1 षटकात सर्वबाद 115 धावा करू शकला.
Aayush Ambekar 77 Runs
आयुष आंबेकर, बेस्ट बॅट्समन (77 धावा)
क्रिकेट एक्सप्लेन अकादमी डोंबिवलीच्या संघाकडून आर्या सागरेने 35 धावांची चांगली खेळी केली. स्पीड स्पोर्ट्स क्लबकडून भाग्य पटेल याने सर्वाधिक 34 धावा केल्या.
क्रिकेट एक्सप्लेन अकादमी डोंबिवलीच्या संघाकडून आर्या सागरे, अर्णव संत आणि संदीप सावंत यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
scorecard
scorecard
ram baran scorecard
scorecard
मॅच समरी
 • 25 मे, सकाळी 09:56 वाजता सामना सुरू झाला.
 • क्रिकेट एक्सप्लेन अकादमी डोंबिवली: 10.1 षटकात 50 धावा, एक्स्ट्रा 17
 • दुसरी विकेट: ६९ चेंडूत ५० धावा (यशवी गोरी ९(३७), आयुष आंबेकर ३०(३२), एक्स्ट्रा ११)
 • क्रिकेट एक्सप्लेन अकादमी डोंबिवली: 21.5 षटकात 100 धावा, एक्स्ट्रा 27
 • आयुष आंबेकर: 69 चेंडूत 50 (3 X 4, 0 X 6)
 • क्रिकेट एक्सप्लेन अकादमी डोंबिवली: 31.3 षटकात 153 धावा, एक्स्ट्रा 31
 • तिसरी विकेट: 38 चेंडूत 50 धावा (आर्या सागरे 34(27), आयुष आंबेकर 13(11), एक्स्ट्रा 3)
 • क्रिकेटचे स्पष्टीकरण क्रिकेट अकादमी डोंबिवली: 38.4 षटकात 200 धावा, एक्स्ट्रा 33
 • इनिंग ब्रेक: क्रिकेट एक्सप्लेन अकादमी डोंबिवली - 40 षटकांत 209/5 (संदीप सावंत 0, पार्थ रघतवान 25)
 • 25 मे, दुपारी 12:48 वाजता डाव संपला
 • 25 मे, दुपारी 01:31 वाजता डाव सुरू झाला
 • स्पीड स्पोर्ट्स क्लब: 6.5 षटकांत 51 धावा, एक्स्ट्रा 12
 • स्पीड स्पोर्ट्स क्लब: 20.5 षटकांत 100 धावा, एक्स्ट्रा 19
 • ड्रिंक्स : स्पीड स्पोर्ट्स क्लब - 24 षटकांत 103/8 (मीट 0, भाग्य पटेल 28)
 • दिवस अखेर : स्पीड स्पोर्ट्स क्लब - 28.1 षटकात 115/10 (शर्विल परब 0)
 • 25 मे, दुपारी 03:47 वाजता सामना संपला.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited