CRICKET NEWS : राम बरन मेमोरिअल प्रिमिअर लीग 2023मध्ये बीसीए संघाचा 212 धावांनी धमाकेदार विजय

मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या 14 वर्षांखालील मुलांच्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग 2023 स्पर्धेत बीसीए संघाने 212 धावांनी शानदार विजय संपादन केला आहे.

Updated May 23, 2023 | 04:52 PM IST

Aahan Sutram

अहान सुत्रम यांच्या 57 चेंडूत 100 धावा, सामनावीराचा मानकरी

फोटो साभार : Times Now Marathi
मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या 14 वर्षांखालील मुलांच्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग 2023 स्पर्धेत बीसीए संघाने 212 धावांनी शानदार विजय संपादन केला आहे.
Late Shri Ram Baran Memorial Premier League 2023 U 14
आझाद मैदान येथील टाइम्स ऑफ इंडिया मैदानावर श्री राम बरन मेमोरियल प्रीमियर लीग 2023 चा उद्घाटन सोहळा
अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर 14 स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित करीत आहे. गेल्या वर्षाच्या शानदार यशानंतर 22 मे रोजी या स्पर्धेची सुरूवात झाली.
आझाद मैदानावर झालेल्या एकतर्फी सामन्यात सीएन स्पोर्ट्स अकादमीच्या संघाला रिअल बीसीए संघाने 212 धावांनी विजय मिळविला. पहिल्या फलंदाजी करताना बीसीए संघाने निर्धारीत 40 षटकात 4 बाद 338 धावा केल्या. यात अहान सुत्रम यांच्या 57 चेंडूत 100 धावांचा मोलाचा वाटा आहे. त्याने 17 चौकार आणि 1 षटकार लगावाला. बीसीए संघाच्या 334 धावांचा पाठलाग करताना सीएन स्पोर्ट्स अकादमीचा संघ 34.4 षटकात सर्वबाद 126 धावा करू शकला.
team
team
बीसीएकडून देवेश बिर्जे 57 आणि अगस्त्य काशीकर 50 यांनी मोलाची धाव संख्या उभारली. बीसीए संघाकडून प्रभात पांडे, अक्षय चिंचवडकर आणि धवल पी. यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
मॅच समरी
सामना 22 मे, सकाळी 09:55 वाजता सुरू झाला.
B.C.A: 7.2 षटकात 50 धावा, अतिरिक्त 14
दुसरी विकेट: 47 चेंडूत 53 धावा (अगस्त्य जयदीप काशीकर 24(24), शौर्य सोंडकर 13(23), माजी 16)
B.C.A: 16 षटकात 100 धावा, अतिरिक्त 30
अगस्त्य जयदीप काशीकर: 51 चेंडूत 50 (6 X 4, 0 X 6)
B.C.A: 20.5 षटकात 150 धावा, अतिरिक्त 34
चौथी विकेट: 24 चेंडूत 50 धावा (अहान सूत्रम 31(13), देवेश बिर्जे 16(11), अतिरिक्त 3)
अहान सूत्रम: 28 चेंडूत 50 (8 X 4, 1 X 6)
B.C.A: 26.3 षटकात 201 धावा, अतिरिक्त 35
चौथी विकेट: ५५ चेंडूत १०० धावा (अहान सूत्रम ५७(३२), देवेश बिर्जे ३९(२३), अतिरिक्त ४)
देवेश बिर्जे: 38 चेंडूत 53 (6 X 4, 0 X 6)
B.C.A: 31.1 षटकात 253 धावा, अतिरिक्त 45
अहान सूत्रम: 57 चेंडूत 100 (17 X 4, 1 X 6)
B.C.A: 35.5 षटकात 301 धावा, अतिरिक्त 52
5वी विकेट: 30 चेंडूत 50 धावा (धवल पी 7(12), अक्षय चिंचवडकर 37(18), अतिरिक्त 6)
इनिंग ब्रेक: B.C.A - 40 षटकात 338/4 (धवल पी 10, अक्षय चिंचवडकर 37)
22 मे, दुपारी 01:04 वाजता डाव संपला
22 मे, दुपारी 01:50 वाजता डाव सुरू झाला
सी एन स्पोर्ट्स अकादमी: 21.3 षटकात 50 धावा, अतिरिक्त 26
सी एन स्पोर्ट्स अकादमी: 31.2 षटकात 100 धावा, अतिरिक्त 37
दिवस अखेर : सी एन स्पोर्ट्स अकादमी - 34.4 षटकात 126/10 (कृपाल सिंग 0)
सामना 22 मे, 04:03 PM ला संपला.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited