GT vs MI : गुजरातला हरवण्यासाठी मुंबई वापरणार हा फॉर्म्युला?

IPL 2023 GT vs MI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (मंगळवार 25 एप्रिल 2023) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2023 ची पस्तिसावी मॅच खेळवली जाणार आहे. ही मॅच जिंकून पॉइंट्स टेबलमधील स्वतःची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करणार आहेत. सध्या पॉइंट्स टेबलमध्ये 8 पॉइंट्ससह (नेट रनरेट +0.212) गुजरात टायटन्सची टीम चौथ्या स्थानी आहे. तर 6 पॉइंट्ससह (नेट रनरेट -0.254) मुंबई इंडियन्सची टीम सातव्या स्थानी आहे.

Updated Apr 25, 2023 | 10:08 AM IST

Gujarat Titans vs Mumbai Indians

Gujarat Titans vs Mumbai Indians

IPL 2023 GT vs MI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (मंगळवार 25 एप्रिल 2023) गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2023 ची पस्तिसावी मॅच खेळवली जाणार आहे. ही मॅच जिंकून पॉइंट्स टेबलमधील स्वतःची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करणार आहेत. सध्या पॉइंट्स टेबलमध्ये 8 पॉइंट्ससह (नेट रनरेट +0.212) गुजरात टायटन्सची टीम चौथ्या स्थानी आहे. तर 6 पॉइंट्ससह (नेट रनरेट -0.254) मुंबई इंडियन्सची टीम सातव्या स्थानी आहे.
सलग तीन मॅच जिंकणाऱ्या मुंबईला पंजाब किंग्सने रोखले. यामुळे मुंबईची स्थिती 6 पैकी 3 मॅचमध्ये विजय आणि 3 मॅचमध्ये पराजय अशी झाली. याउलट गुजरातने त्यांच्या 6 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. गुजरातला 2 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
मुंबईला पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या पाच ओव्हरमध्ये 96 धावा देणे भोवले. पंजाबने मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये शेवटच्या पाच ओव्हरमधील फटकेबाजीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 8 बाद 214 धावा केल्या. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 बाद 201 धावा एवढीच मजल मारता आली. पंजाबने मॅच 13 धावांनी जिंकली. या मॅचमध्ये बॉलिंग करताना झालेल्या चुका टाळणे जमले तर मुंबईला गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करणे शक्य होईल, असा विश्वास क्रिकेटचे अभ्यासक व्यक्त करत आहेत.
गुजरातची बॉलिंगची बाजू कमकुवत आहे. त्यांचा कॅप्टन हार्दिक पांड्या बॉलिंगच्याबाबतीत वारंवार अपयशी ठरत आहे. गुजरातच्या कमकुवत बॉलरच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा काढणे आणि स्वतःच्या बॉलिंगच्यावेळी चुका टाळणे या दोन गोष्टी करणे जमले तर मुंबईला गुजरात विरुद्धची मॅच जिंकणे शक्य आहे, असे मत क्रिकेटचे अभ्यासक व्यक्त करत आहेत.
  1. मंगळवार 25 एप्रिल 2023
  2. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण
  3. आयपीएल 2023, मॅच 35 वी
  4. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  5. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद, गुजरात
  6. स्ट्रीमिंग : जिओ सिनेमा
  7. टीव्ही प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्कचे टीव्ही चॅनल
गुजरात टायटन्स टीम : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुभमन गिल, विजय शंकर , अभिनव मनोहर , डेव्हिड मिलर , राहुल तेवतिया , राशिद खान , मोहम्मद शमी , नूर अहमद , मोहित शर्मा , जयंत यादव , जोशुआ लिटिल , शिवम मावी , रविश्रीनिवासन साई किशोर , श्रीकर भरत , साई सुदर्शन , अल्जारी जोसेफ , प्रदीप सांगवान , मॅथ्यू वेड ,दासुन शनाका , ओडियन स्मिथ , दर्शन नालकंडे , उर्विल पटेल , यश दयाल
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव , कॅमरन ग्रीन , टिम डेविड , तिलक वर्मा , ऋतिक शौकीन , अर्जुन तेंडुलकर , जोफ्रा आर्चर , पीयूष चावला , जेसन बेहरेनडॉर्फ , नेहल वढेरा , रमणदीप सिंह , कुमार कार्तिकेय , शम्स मुलानी , विष्णू विनोद , रिले मेरेडिथ , संदीप वारियर , डुआन जानसन , ट्रिस्टन स्टब्स ,देवल्ड ब्रेविस , आकाश मधवाल , अर्शद खान , राघव गोयल
ताज्या बातम्या

Maharashtra Politics: एकनाथ खडसेंच्या कार्यकाळात 6.60 कोटींचे नुकसान - मंगेश चव्हाण

Maharashtra Politics    660   -

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी संदेश, Whatsapp Messages द्वारे महापुरुषाला करा विनम्र अभिवादन

Mahaparinirvan Din 2023         Whatsapp Messages

सनरुफ, क्लासिक लुकसह Yakuza Karishmaची इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत 1.70 लाख रुपये!

   Yakuza Karishma     170

Nagpur Crime : नाश्ता मिळाला नाही, रागाच्या भरात सोडलं घर; रेल्वे स्थानकाजवळ झाडाला...

Nagpur Crime

Lion Attack: बोट दाखवणाऱ्याला सिंहाने शिकवला धडा, Video पाहून तुम्हालाही वाटेल भीती

Lion Attack      Video

Pune Crime : विद्येच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घातला लाखोंचा गंडा

Pune Crime

Airoli-Katai Naka Freeway: डोंबिवली-नवी मुंबई प्रवास होणार सुसाट; ऐरोली-काटई बोगद्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार

Airoli-Katai Naka Freeway -     -  45   10

Kashmir Tourism: हिवाळ्यात काश्मीरला फिरायला जाताय? या चुका अजिबात करू नका

Kashmir Tourism
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited