MI Vs RCB : रोहित शर्मा विरुद्ध विराट कोहली रंगणार सामना; वाचा पीच रिपोर्ट अन् हवामान अंदाज

IPL 2023: आयपीएलमध्ये आता प्लेऑफमध्ये जागा मिळविण्यासाठीची चुरस वाढली आहे. अशात, मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) विरुद्ध मुंबई इंडियन्स आमने सामने येणार आहेत. मात्र हा सामना केवळ या दोन उभय संघांमधील नसून टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात देखील होणार आहे.

Updated May 9, 2023 | 02:33 PM IST

IPL 2023, MI vs RCB Pitch Report, Weather

IPL 2023, MI vs RCB Pitch Report, Weather

फोटो साभार : BCCL
IPL 2023, MI vs RCB Pitch Report Today Match and Weather Forecast: आयपीएलमध्ये आता प्लेऑफमध्ये जागा मिळविण्यासाठीची चुरस वाढली आहे. अशात, मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) विरुद्ध मुंबई इंडियन्स आमने सामने येणार आहेत. मात्र हा सामना केवळ या दोन उभय संघांमधील नसून टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात देखील होणार आहे. आजचा सामना मुंबई इंडियन्सच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, त्यामुळे हा सामना आरसीबीसाठी मोठे आव्हान असणार आहे.
आयपीएलच्या पॉईंट टेबलवर नजर टाकल्यास मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे आकडे सारखेच असल्याचं दिसत आहे, फक्त दोघांच्या नेट रनरेटमध्ये थोडा फरक आहे. या मोसमात आतापर्यंत मुंबई इंडियन्सने 10 सामन्यांमध्ये 5 जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत, तर त्यांचा रनरेट -0.454 आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनेही 10 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत, तर त्यांचा नेट रनरेट -0.209 आहे. बेंगलोरचा नेट रन रेट मुंबईच्या तुलनेत चांगला आहे पण या आकड्यामंध्ये बदल व्हायला फारसा वेळ लागत नाही. सर्वाधिक आयपीएल जेतेपदे पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ आजचा सामना जिंकून टॉप-4मध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करेल.

मुंबई-बेंगलोर सामन्याची खेळपट्टीचा कशी असेल? (MI vs RCB पिच रिपोर्ट)

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्सचे हे घरचे मैदान असले तरी विराट कोहलीसह आरसीबीच्या इतर अनेक खेळाडूंसाठी हे मैदान पाठ आहे. इथल्या पीच बोलायचे झाल्यास फलंदाजांसाठी उत्तम विकेट आहे. या हंगामात आतापर्यंत इथे 4 सामने खेळले गेले आहेत. यातील प्रत्येक सामन्यात दोन्ही संघांची धावसंख्या 150 च्या पुढे गेली आहे. यामध्ये दोन्ही संघांच्या धावसंख्येने 2 सामन्यात 185 तर शेवटच्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी 200 चा टप्पा ओलांडला. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध 214 धावा फटकावल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 201 धावा करून पराभूत झाला. त्यानंतरच्या राजस्थान आणि मुंबई सामन्यात राजस्थानने मुंबईला 213 धावांचे लक्ष्य दिले होते आणि मुंबईने हे लक्ष्य 19.3 षटकांत 4 विकेट्स गमावून पूर्ण केले.

आज मुंबईचे हवामान कसे असेल? (मुंबईचे आजचे हवामान)
आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील सामना होणार असल्याने सर्वांच्या नजरा हवामानाकडे लागल्या आहेत. दिवस खूप उष्ण असणार असणार आहे. मुंबईच्या आजच्या तापमानाबद्दल बोलायचे झाले तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 29 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
आजचा आयपीएल सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. दोन्ही संघात अनेक तगडे खेळाडू आहेत, ज्यांच्यावर चाहत्यांची नजर असेल, पण विराट कोहली, रोहित शर्मा, फाफ डुप्लेसिस, इशान किशन आणि तिलक वर्मा या खेळाडूंकडून चांगल्ता कामगिरीची अपेक्षा असणाद आहे.

संघ खालीलप्रमाणे आहेत
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (क), जोफ्रा आर्चर, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, टिम डेव्हिड, राघव गोयल, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन (विकेटकीपर), ड्वेन जॅन्सन, ख्रिस जॉर्डन, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल , रिले मेरेडिथ, शम्स मुलानी, रमणदीप सिंग, संदीप वॉरियर, हृतिक शोकीन, ट्रिस्टन स्टब्स, अर्जुन तेंडुलकर, टिळक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डुप्लेसी (क), आकाश दीप, फिन ऍलन, अनुज रावत, अविनाश सिंग, मनोज भांडगे, मायकेल ब्रेसवेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सिद्धार्थ कौल, विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, वेन पारनेल, हर्षल पटेल, सुयश प्रभुदेसाई, राजन कुमार, शाहबाज अहमद, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, सोनू यादव, विजयकुमार वैशाक, केदार जाधव.

ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited