MI vs RR: डेविडच्या 3 सिक्सरने बदलला वानखेडे स्टेडियमचा इतिहास, 4 वर्षांपूर्वीचा रेकॉर्डही तुटला

आयपीएल 2023 मध्ये रविवारी (30 एप्रिल) रोजी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मॅच झाली. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. टिम डेविडच्या तुफानी खेळीने मुंबईला विजय मिळवून दिला. डेविडने 14 बॉल्समध्ये 45 रन्स केले आणि मुंबईला अगदी सहज विजय मिळवून दिला.

Updated May 1, 2023 | 03:00 PM IST

MI vs RR: डेविडच्या 3 सिक्सरने बदलला वानखेडे स्टेडियमचा इतिहास, 4 वर्षांपूर्वीचा रेकॉर्डही तुटला
Mumbai Indians vs Rajasthan Royals: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टिम डेविडने तुफानी इनिंग खेळत राजस्थान रॉयल्सच्या हातातून मॅच हिसकावून घेतली. मुंबई इंडियन्सच्या टिम डेविडने शेवटच्या ओव्हरमध्ये एकामागे एक असे तीन सिक्सर लगावले आणि टीमला विजय मिळवून दिला. या विजयासोबतच मुंबई इंडियन्सने चौथा विजय मिळवला. या विजयासोबतच मुंबई इंडियन्सने अनेक रेकॉर्ड्स नोंदवले.

वानखेडे मैदानात सर्वाधिक रन्सचा पाठलाग

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्सने पराभव केला. मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधील सर्वाधिक रन्सचा पाठलाग करत विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्स समोर 213 रन्सचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सच्या टीमने 3 बॉल्स शिल्लक ठेवत गाठलं. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कधीही वानखेडे स्टेडियमवर 200 रन्सहून अधिकचं आव्हान गाठत विजय मिळवता आलेला नव्हता. मुंबईने 2019 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना 198 रन्सचं आव्हान गाठत विजय मिळवला होता.

आयपीएलमध्ये दुसरा सर्वात मोठा रन चेज

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध आयपीएलच्या इतिहासात दुसरा सर्वात मोठा रन चेज यशस्वीरित्या पूर्ण केला. मुंबईसाठी खेळताना टिम डेविडच्या व्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने सुद्धा तुफानी इनिंग खेळली. सूर्यकुमारने 29 बॉल्समध्ये 55 रन्स केल्या. तर तिलक वर्माने 21 बॉल्समध्ये 29 रन्सची नॉट आऊट इनिंग खेळली.
मुंबई इंडियन्सला हा विजय मिळवून देण्यात टिम डेविडने महत्त्वाची कामगिरी केली. डेविडने शेवटच्या ओव्हरमध्ये सलग तीन सिक्सर लगावत राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. मुंबईच्या टिम डेविडने 14 बॉल्सवर 321च्या स्ट्राईक रेटने खेळताना 45 रन्स केल्या. या इनिंगमध्ये त्याने दोन फोर आणि पाच सिक्सर लगावले.

यशस्वीची सेंच्युरी

राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जायसवाल याने जबरदस्त इनिंग खेळत आयपीएल करिअरमधील पहिली सेंच्युरी पूर्ण केली. यशस्वीने स्फोटक बॅटिंग करत 62 बॉल्समध्ये 124 रन्सची इनिंग खेलली. यशस्वीच्या या दामदार इनिंगमुळे राजस्थान रॉयल्सच्या टीमने मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक स्कोअर उभा केला.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited