पाकिस्तान प्रथमच वनडे क्रमवारीत अव्वल, भारत-ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

ICC ODI Ranking: पाकिस्तानच्या संघाने चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 102 धावांनी पराभव केला आणि ICC ODI क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. असे करताना पाकिस्तानने भारत आणि ऑस्ट्रेलिया सारख्या भलाढय संघाला मागे टाकले आहे.

Updated May 6, 2023 | 02:22 PM IST

Pakistan No. 1 ODI Team

पाकिस्तान ICC ODI क्रमवारीत अव्वल स्थानावर

फोटो साभार : AP
थोडं पण कामाचं
  • एकदिवसीय क्रमवारीत 113 गुणांची बरोबरी
  • काही दशांश फरकाने भारत दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर
  • ODI Raniking मध्ये अव्वल राहण्यासाठी पाकिस्तानला पाचव्या एकदिवसीय सामन्यातही विजय मिळवावा लागेल.
ICC ODI Ranking: ICC ODI रँकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघ एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. आता पाकिस्तानचेही एकदिवसीय क्रमवारीत ११३ गुण झाले असून, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या बरोबरी आहे. मात्र, काही दशांश गुणांच्या फरकामुळे पाकिस्तानला क्रमवारीत फायदा झाला आहे. पाकिस्ताननंतर भारत आता ११३.४८३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 113.286 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यानंतर ICC ODI क्रमवारीत पहिले स्थान मिळाले आहे.

शुक्रवारी झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात यकिस्तानने न्यूझीलंडचा १०२ धावांनी पराभव करत हे स्थान मिळवले आहे. पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान संघाचे 106 गुण होते आणि त्यावेळी पाकिस्तान वनडे क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर होता.

पाकिस्तानने केली 4-0 अशी आघाडी

पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे. संघ क्लीन स्वीपपासून एक पाऊल दूर आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात पाकिस्तान संघाने 334 धावा केल्या होत्या, त्याच्या प्रत्युत्तरात किवी संघ 43.4 षटकात 232 धावांवर गारद झाला. याआधी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात किवी संघाचा पाकिस्तानकडून 26 धावांनी पराभव झाला होता. एकदिवसीय क्रमवारीत अव्वल राहण्यासाठी पाकिस्तानला पाचव्या एकदिवसीय सामन्यातही विजय मिळवावा लागेल, जर पाकिस्तानचा संघ पाचव्या एकदिवसीय सामन्यात पराभूत झाला तर ते वनडे क्रमवारीतील पहिले स्थान गमावून बसतील.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited