संपूर्ण टीम 9 रन्सवर All Out, सात बॅटर्सला खातंही उघडता आलं नाही, वाचा कोणत्या टीमची झाली ही अवस्था

क्रिकेटमध्ये कोणती टीम चांगला परफॉर्मन्स दाखवेल आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो याचा अंदाज लावता येऊ शकत नाही. ज्या टीमचे प्लेअर्स उत्कृष्ट कामगिरी दाखवतील त्यांचा विजय होण्याची शक्यता अधिक असते.

Updated May 3, 2023 | 04:19 PM IST

संपूर्ण टीम 9 रन्सवर All Out, सात बॅटर्सला खातंही उघडता आलं नाही, वाचा कोणत्या टीमची झाली ही अवस्था
Philippines Women vs Thailand Women Crieckt Team: क्रिकेटच्या मैदानात अनेक रेकॉर्ड्स होत असतात. अनेक जुने रेकॉर्ड्स तुटतात आणि नवे रेकॉर्ड्स बनतात. मैदानात कधी बॅटर्सचा बोलबाला असतो तर कधी बॉलर्स आपला करिश्मा दाखवतात. अनेक रेकॉर्ड्स बनताना तुम्ही पाहिलं असेल मात्र, संपूर्ण टीम 9 रन्सवर ऑल आऊट झाल्याचं तुम्ही कधी पाहिलं किंवा ऐकलं आहे का? आश्चर्य वाटलं का? पण हे खरं आहे.

9 रन्सवर संपूर्ण टीम ऑल आऊट

थायलंड आणि फिलिपीन्सची महिला टीम यांच्यात इंटरनॅशनल मॅच खेळवण्यात आली. टी-20 मॅचमध्ये फिलिपीन्सची टीम प्रथम बॅटिंगसाठी मैदानात उतरली मात्र, अवघ्या 9 रन्सवर संपूर्ण टीम ऑल आऊट झाली. टीमकडून कोणत्याही एका बॅटरला दहा रन्सचा आकडा गाठता आला नाही. चार बॅटर्सने 2-2 रन्स केल्या तर एक रन अतिरिक्त मिळाला. थायलंडच्या टीमकडून थिपाचा पुथवोंगने चार विकेट्स घेतल्या आणि ओनिका कामचोमफुने तीन विकेट्स घेतल्या.

4 बॉल्समध्ये आव्हान पूर्ण

फिलिपीन्सच्या टीमने दिलेलं 10 रन्सचं आव्हान थायलंडच्या टीमने अवघ्या चार बॉल्समध्येच गाठलं. थायलंडच्या टीमकडून कॅप्टन नानापट कोंचरोनेकाई आणि नत्थाकन चंथम यांनी ओपनिंग केली. एलेक्स स्मिथच्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही बॅटर्सने बॅटिंग करत मॅच संपवली. नानापटने दोन बॉल्समध्ये 3 रन्स केल्या तर नत्थाकनने एक फोर लगावत 6 रन्स जोडले.

मालदीवच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड

महिला टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात कमी स्कोअरचा लाजीरवाणा रेकॉर्ड हा मालदीव क्रिकेट टीमच्या नावावर आहे. मालदीवची टीम बांगलादेश विरुद्ध खेळताना 6 रन्सवर ऑल आऊट झाली होती. तर नेपाळच्या विरुद्ध खेळताना मालदीवची संपूर्ण टीम अवघ्या 8 रन्सवर ऑल आऊट झाली होती. त्यानंतर आता या लाजीरवाण्या रेकॉर्ड्सच्या यादीत फिलिपीन्सच्या टीमचंही नाव जोडलं आहे.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited