मुंबईच्या मुलांनी तेलंगणाच्या मुलांना लोळवलं.... 23 धावांनी केला पराभव

स्कूल फेड्रेशन ऑफ इंडिया आयोजित 13 व्या 14 वयोगटाखालील मुलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई स्कूल क्रिकेट असोसिएशनच्या संघाने तेलंगणा स्कूल क्रिकेट असोशिएशनच्या संघाचा 23 धावांनी पराभव केला. मुंबईत महाराष्ट्र स्कूल क्रिकेट असोशिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील पहिला सामना ओव्हल मैदानावर झाला. ही स्पर्धे 16 ते 19 मे दरम्यान खेळवली जाणार आहे.

Updated May 17, 2023 | 04:18 PM IST

mumbai school

मुंबईचा विजयी संघ आणि 59 चेंडूत 52 धावांची खेळी केलेला देवांशीश घोडके

फोटो साभार : Times Now Marathi
मुंबई : स्कूल फेड्रेशन ऑफ इंडिया आयोजित 13 व्या 14 वयोगटाखालील मुलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत मुंबई स्कूल क्रिकेट असोसिएशनच्या संघाने तेलंगणा स्कूल क्रिकेट असोशिएशनच्या संघाचा 23 धावांनी पराभव केला.
मुंबईत महाराष्ट्र स्कूल क्रिकेट असोशिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील पहिला सामना ओव्हल मैदानावर झाला. ही स्पर्धे 16 ते 19 मे दरम्यान खेळवली जाणार आहे.
Mumbai School Association under 14 boys
Mumbai School Association under 14 boys
फोटो साभार : Times Now Marathi
प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने निर्धारीत 20 षटकात 3 बाद 124 धावा केल्या. मुंबईकडून देवांशीश घोडके याने 59 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यात त्याने 4 चौकार लगावले. मुंबईच्या 124 धावांचा पाठलाग करताना तेलंगणाचा संघ निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 101 धावा करू शकला.
Telangana School Cricket Association Boys
Telangana School Cricket Association Boys
फोटो साभार : Times Now Marathi
तेलंगणाकडून के ध्रुव आणि निश्चल रेड्डी यांनी प्रत्येकी 31 धावा केल्या. मुंबईकडून अनिमेष घोडपडे याने 2, अर्णव आणि कार्तिक घरत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Maharashtra School Cricket Association
Maharashtra School Cricket Association
Scorecard
मुंबईच्या मुलांनी तेलंगणाच्या मुलांना लोळवलं.... 23 धावांनी केला पराभव
फोटो साभार : Times Now Marathi
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited