ज्या मैदानावर हरला, त्यालाच धोनी म्हटला खूप स्पेशल

RR vs CSK: राजस्थान रॉयल्सने एमएस धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्जचा 32 धावांनी पराभव केला. सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियमवर संजू सॅमसनच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्याच चेंडूपासून सामन्यावर वर्चस्व गाजवले. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये चेन्नईचा कर्णधार धोनीने आपल्या इंटरनॅशनल करिअरमधली वनडे मॅचमधील खेळीची आठवण आली. त्यामुळे तो भावूक झाला होता.

Updated Apr 28, 2023 | 08:37 AM IST

rrvscsk

The ground on which Dhoni lost, told him very special,

RR vs CSK: राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात एमएस धोनीच्या टीम CSK ला पराभवाचा सामना करावा लागला. जयपूरचे एसएमएस स्टेडियम अतिशय खास असल्याचे सांगताना त्याची आठवण करून दिली. (the ground on csk lost, dhoni told him very special,)
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 202 धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना चेन्नईला 6 गडी गमावून केवळ 170 धावा करता आल्या. सीएसकेची युवा गोलंदाज मथिशा पाथिरानाने 4 षटकात 48 धावा लुटल्या, तरीही धोनीने त्याचा बचाव केला.

पराभवानंतर धोनी म्हणाला - जयपूरचे मैदान अतिशय खास असल्याचे वर्णन करताना धोनी म्हणाला - हे खूप खास ठिकाण आहे, विझागमधील माझ्या पहिल्या शतकामुळे मला 10 सामन्यात खेळायला मिळाले, पण मी येथे केलेल्या 183 धावांमुळे माझे टीम इंडियातील स्थान पक्के झाले. इथे परत येऊन खूप छान वाटलं. भारताच्या श्रीलंका दौऱ्यात 31 ऑक्टोबर 2005 रोजी जयपूरमध्ये धोनीने टीम इंडियाला 183 धावा करून शानदार विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने 15 चौकार-10 षटकार मारले. त्यावेळी राहुल द्रविड कर्णधार होता.
या विजयासह राजस्थान राॅयलची टीम आठ सामन्यांत पाच विजय आणि 10 गुणांसह पाॅईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्यांनी केवळ तीनच सामने गमवले आहेत. त्याचवेळी, धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ आठ सामन्यांत 5 विजय आणि 3 पराभवांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दुसऱ्या स्थानावर गुजरात टायटन्स चेन्नईपेक्षा चांगला रनरेट आणि 10 गुणांसह आहे. चेन्नईला पंजाब किंग्जविरुद्ध रविवारी चेपॉक येथे पुढील सामना खेळायचा आहे. त्याचवेळी राजस्थानला रविवारीच वानखेडेवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहे.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited