उमर इलेव्हनचा विजयी षटकार, सुप्रिमोत सलग सहा विजयांचा नवा विक्रम

गतविजेत्या उमर इलेव्हन एंजल स्पोर्टस् ने टेनिस क्रिकेटची आयपीएल असलेल्या सुप्रिमो चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन्ही लढती जिंकत स्पर्धेत विजयाचा षटकार ठोकला. त्यांनी सलामीच्या लढतीत एसएससीसी डोबिंवली आणि उपांत्यपूर्व फेरीत रायगड इलेव्हन ट्रायडेंटचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली. बुधवारी रात्री सुप्रिमो चषकाच्या दहाव्या मोसमाचा डोळ्यांचे पारणे फेडणारा उद्घाटन सोहळा तब्बल १५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.

Updated May 22, 2023 | 01:50 PM IST

Suprimo Trophy

उमर इलेव्हनचा विजयी षटकार सुप्रिमोत सलग सहा विजयांचा नवा विक्रम

फोटो साभार : Times Now Marathi
मुंबई : गतविजेत्या उमर इलेव्हन एंजल स्पोर्टस् ने टेनिस क्रिकेटची आयपीएल असलेल्या सुप्रिमो चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन्ही लढती जिंकत स्पर्धेत विजयाचा षटकार ठोकला. त्यांनी सलामीच्या लढतीत एसएससीसी डोबिंवली आणि उपांत्यपूर्व फेरीत रायगड इलेव्हन ट्रायडेंटचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली.
बुधवारी रात्री सुप्रिमो चषकाच्या दहाव्या मोसमाचा डोळ्यांचे पारणे फेडणारा उद्घाटन सोहळा तब्बल १५ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. स्टेडियमवर षटकार-चौकारांची फटकेबाजी सुरू होण्याआधी झालेली फटाक्यांची आतषबाजी, अंगावर शहारे आणणारे उत्साही कलाकारांचे भन्नाट सादरीकरण आणि प्रेक्षकांच्या अभूतपूर्व गर्दीने सारे वातावरण सुप्रिमोमय झाले होते.
Actor Sunil Shetty playing Suprimo trophy
Actor Sunil Shetty playing Suprimo trophy
फोटो साभार : Times Now Marathi
टेनिस क्रिकेटची आयपीएल असलेल्या सुप्रिमो चषकाच्या पाचदिवसीय धमाकेदार स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन सिनेस्टार सुनील शेट्टी यांनी फलंदाजी करून केले. याप्रसंगी हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू लालचंद राजपूत, पिच क्युरेटर नदीम मेमन, आमदार सुनील प्रभ, आमदार सुनील शिंदे,सुप्रिमो चषकाचे आयोजक आमदार-विभागप्रमुख संजय पोतनीस आणि आमदार विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब उपस्थित होते.
स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला तो गतविजेत्या उमर इलेव्हन संघाने. सुप्रिमो चषकातील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या अनिकेत सानपने ११ धावांत ३ विकेट टिपत एसएससीसी संघाच्या डावाला सुरूंग लावला. राजू मुखियानेही २ विकेट घेत एसएससीसीला ५५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरादाखल मुन्ना शेखच्या २२ धावांच्या वेगवान खेळीने उमर इलेव्हनला १४ चेंडू आधीच विजय मिळवून दिला.
दुसर्‍या सामन्यात उरण रायगड इलेव्हनने सिकंदर भट्टी (२०) आणि बंटी पटेल (२२) यांच्या फटकेबाजीमुळे ६ बाद ८३ अशी जबरदस्त मजल मारली. एकेएम स्पोर्टस् गावदेवी गावठण संघाला हे आव्हान पेलवलेच नाही. इरफान मलिक आणि विश्वजीत ठाकूर यांच्या अचूक मार्‍यापुढे एकेएमचा संघ ५९ धावाच करू शकला आणि रायगड इलेव्हनने २४ धावांनी दणदणीत विजय नोंदविला. पहिल्या दोन लढतींच्या विजेत्यांमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उमर इलेव्हनने मुन्ना शेख (२१) आणि श्रेयस कदम (२१) यांच्या घणाघातामुळे ६ बाद ६९ अशी आव्हानात्मक मजल मारली.
७० धावांचा पाठलाग करताना सुनील चावरीने जोरदार खेळ करीत सामन्यात चुरस निर्माण केली. शेवटच्या दोन षटकांत २१ धावांची गरज होती. पण भावेश पवार आणि राजू मुखियाने अप्रतिम गोलंदाजी टाकत रायगड इलेव्हनला अक्षरशा बांधून ठेवले आणि केवळ दहा धावाच दिल्या. चावरीने २ षटकार आणि २ चौकार खेचत नाबाद ३१ धावा केल्या. अनिकेत सानपने या सामन्यातही २ विकेट घेत उमर इलेव्हनला उपांत्य फेरी गाठून दिली. या विजयासह उमरने सुप्रिमोमध्ये सलग सहा सामने जिंकले. सलग सहा सामने जिंकणारा उमर इलेव्हन हा पहिलाच संघ ठरला आहे.

सुप्रिमो म्हणजे मिनी आयपीएलच

आपला सुप्रिमो चषक म्हणजे मिनी आ़यपीएलच आहे. इथेसुद्धा देशभरातून अनेक संघ आले आहेत. सुप्रिमोच्या दिमाखदार आयोजनासाठी अनिल परब आणि संजय पोतनीस यांचे विशेष कौतुक करावेच लागेल. हे दोघे सुप्रिमो चषकाचे कॅप्टन आहेत आणि इथे मी त्यांच्या टीमचेही खास कौतुक करतो. सुप्रिमा चषकाची कीर्ती म्हणता म्हणता देशभर पसरलीय. जसे आ़यपीएलमधून देशाला खेळाडू मिळतात तसेच खेळाडू आपल्या टेनिस आयपीएलमधून भारतीय संघाला मिळतील, याची मला पूर्ण खात्री असल्याची भावना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited