2022 Yamaha FZS Features | नवी दिल्ली : Yamaha Motor India ने देशात नवीन मॉडेल FZS 25लॉन्च केले आहे. FZS 25प्रथम जुलै २०२० मध्ये BS६ यासह सादर करण्यात आले होते. याशिवाय कंपनीने गेल्या वर्षी या मोटरसायकलच्या किमतीत १९,३०० रुपयांपर्यंत कपात केली होती. आता जपानी दुचाकी निर्मात्याच्या भारतीय सहाय्यक कंपनीने २०२२ साठी अपडेट केलेले मॉडेल FZS 25लाँच केले आहे. नवीन २०२२ Yamaha FZS 25भारतात आजच्या घडीला १.४३ लाख रुपयांत एक्स-शोरूम दिल्ली येथे लाँच करण्यात आली आहे. (2022 Yamaha FZS The much talked about bike has launched in India Find out what's special this time).
दरम्यान, बदलांबद्दल बोलायचे झाले तर, नवीन FZS 25मधील एकमेव बदल म्हणजे दोन नवीन रंग हा एवढाच बदल सुरूवातीला पाहायला मिळतो. Yamaha Motor India FZS 25मॅट कॉपर आणि मॅट ब्लॅक कलर शेडमध्ये देत आहे. या नवीन रंगांना वगळले तर ही मोटरसायकल तशीच पहिल्यासारखी आहे. तर दुसरीकडे, स्टँडर्ड Yamaha FZ २५ ला देखील कोणतेही कॉस्मेटिक अपडेट मिळत नाहीत आणि सध्या त्याची किंमत एक्स-शोरूम दिल्ली येथे १.३८ लाख रुपये आहे.
लक्षणीय बाब म्हणजे Yamaha FZ २५ आणि FZS 25मध्ये 249cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, SOHC, इंधन-इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन ८००० RPM वर २०.५ hp ची जास्तीत जास्त पॉवर आणि ६००० RPM वर २०.१ Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हार्डवेअरच्या बाबतीत मोटरसायकलला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ७-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक शोषक मिळत आहेत.
ब्रेकबाबत बोलायचे झाले तर समोर आणि मागे डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत आणि त्यांना ड्युअल-चॅनल एबीएस देखील मिळतात. नवीन फिटर्स बद्दल भाष्य केले तर या मोटरसायकलला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी निगेटिव्ह LCD डिस्प्ले मिळतो जो ट्रिपशी संबंधित सर्व आवश्यक माहिती दाखवतो. नवीन Yamaha FZ २५ आणि FZS 25या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त क्वार्टर-लिटर मोटरसायकल आहेत. त्यांची मुख्य स्पर्धा बजाज पल्सर एन २५०, सुझुकी जिक्सर २५०, टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४ व्ही, होंडा हॉर्नेट २.० आणि केटीएम २०० ड्यूक इत्यांदीशी होईल.