5G Auction: आजपासून 5G नेटवर्कसाठी लिलाव सुरू; कॉल आणि इंटरनेट वापरण्याची पद्धत बदलणार, काय असेल नवीन जाणून घ्या

टेक इट Easy
पूजा विचारे
Updated Jul 26, 2022 | 14:35 IST

5g auctions when and where to watch live: 26 जुलै 2022 ज्या दिवशी 5G लिलाव (5G Auction) सुरू होत आहे. 5G स्पेक्ट्रम (5G Spectrum Auction) लिलावात देशातील मोठ्या दूरसंचार कंपन्यांसह इतर स्पर्धकही सहभागी होत आहेत.

5G Auction
आजपासून 5G लिलाव सुरू 
थोडं पण कामाचं
  • अखेर भारतात 5G नेटवर्क (5G Network) लाँच करण्याचं काम अंतिम टप्प्यात आले आहे.
  • 5G स्पेक्ट्रम (5G Spectrum Auction) लिलावात देशातील मोठ्या दूरसंचार कंपन्यांसह इतर स्पर्धकही सहभागी होत आहेत.
  • 5G च्या नेटवर्कमुळे 10 पट जलद सेवांचा मार्ग मोकळा होणार आहे. यावेळी अदानी आणि अंबानी यांच्यात ही स्पर्धा पाहायला मिळतेय.

नवी दिल्ली: 5G Auctions Begin Today: अखेर भारतात  5G नेटवर्क (5G Network) लाँच करण्याचं काम अंतिम टप्प्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आज अल्ट्रा-हाय-स्पीड इंटरनेटसाठी पाचव्या-जनरेशन किंवा 5G टेलिकॉम ऑफर करण्यास सक्षम एअरवेव्हजचा सर्वात मोठा स्पेक्ट्रम लिलाव सुरू करेल. आज म्हणजेच 26 जुलै 2022 ज्या दिवशी 5G लिलाव  (5G Auction) सुरू होत आहे. 5G स्पेक्ट्रम (5G Spectrum Auction) लिलावात देशातील मोठ्या दूरसंचार कंपन्यांसह इतर स्पर्धकही सहभागी होत आहेत. 

Auction च्या शर्यतीत चार अर्जदार सहभागी होतील. 5G च्या नेटवर्कमुळे 10 पट जलद सेवांचा मार्ग मोकळा होणार आहे. यावेळी अदानी आणि अंबानी यांच्यात ही स्पर्धा पाहायला मिळतेय. जरी या दोघांमध्ये थेट स्पर्धा नसली तरी भविष्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. अशावेळी अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की 5G आल्यानंतर नवीन काय मिळणार? 

अधिक वाचा-  अप्पूच्या खडूसनं Instagram वर गाठला मोठा पल्ला

5G नेटवर्कचा सामान्य माणसाला काय फायदा होईल?, यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात काही नवीनपणा पाहायला मिळेल का? तसं बघायला गेल्यास या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं ही 5G नेटवर्क रोल आऊट झाल्यानंतरच मिळतील. पण वास्तव्यात 5G नंतर बरंच काही बदलणार आहे हे निश्चित आहे. 

कशी असेल लिलाव प्रक्रिया 

  • लिलावादरम्यान सरकार 72 GHz स्पेक्ट्रम ब्लॉक करणार आहे. तर भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर, रिलायन्सच्या मालकीची जिओ, सुनील भारती मित्तलची एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि अदानी डेटा लिलावाच्या शर्यतीत सहभागी होणार आहेत. 
  • चार मोठ्या कंपन्यांकडून एकत्रितपणे  21,400 कोटी इनेस्ट मनी डिपॉझिट (EMD) सादर केले आहेत. Jio ने 14 हजार कोटी, Bharti Airtel ने  5 हजार 500 कोटी आणि Adani Data Networks ने  100 कोटी जमा केले आहेत. Vodafone Idea ने  2 हजार 200 कोटींचा EMD सबमिट केला आहे.
  • विविध कमी-फ्रिक्वेंसी बँड (600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz), मध्य (3300 मेगाहर्ट्झ) आणि उच्च-2GHz बँडमध्ये रेडिओवेव्हसाठी लिलाव होणार आहे.

मिळेल एक नवीन अनुभव 

बहुतेक लोकं 2000 च्या दशकात 2G किंवा 3G नेटवर्कचा वापर करत होते. त्यानंतर 4G नेटवर्कच्या आगमनानंतर इंटरनेट स्पीडला नवी दिशा मिळाली.   4G नेटवर्क आल्यानंतरच व्हिडिओ कॉलिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसारख्या हायस्पीड गोष्टींचा अनुभव लोकांना घेता आला. त्याचप्रमाणे 5G नेटवर्क आल्यानंतर ही लोकांना अनेक नवीन आणि वेगवेगळ्या गोष्टी पाहायला आणि अनुभवयाला मिळतील. 

नेटवर्कचा स्पीड जास्त असेल?

बऱ्याच लोकांना असं वाटतं आहे की 5G नेटवर्क म्हणजे फास्ट इंटरनेट स्पीड आहे. पण हे देखील बऱ्याअंशी खरं आहे. सध्या लोकांचं आयुष्य कॉलिंगच्या नाहीतर इंटरनेट डेटाच्या ट्रॅकवर सुरू आहे. अशा परिस्थितीत हे नेटवर्क इंटरनेटमध्ये नवीन फास्ट स्पीड आणेल. 4G नेटवर्कवर आपल्याला100Mbps पर्यंत वेग मिळतो. मात्र  5G मध्ये ते Gbps मध्ये मिळणार आहे.  या नेटवर्कच्या बँडमध्ये 100 पट अधिक वेग मिळवू शकतो.

नेटवर्क कव्हरेज असेल सर्वात चांगलं

जसं 4G आल्यानंतर कॉल्स आणि कनेक्टिव्हिटीचा चांगला फायदा झाला. तसेच, गेल्या पिढीच्या तुलनेत कॉलची गुणवत्ता देखील सुधारली गेली. आपल्याला 5G नेटवर्कवरही कॉलिंगचा चांगला अनुभव मिळणार आहे. कॉल ड्रॉपची समस्याही कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना नेटवर्क रेंज वाढवण्याचा दुसरा पर्याय मिळेल. 

अधिक वाचा-   गोळीबारानं हादरला 'हा' देश, संशयितासह तीन लोकांचा मृत्यू; इतर दोन जखमी

अनेक फायदे होतील

5G नेटवर्क 4G पेक्षा 100 पट जास्त फास्ट असणार आहे. म्हणजेच, यूजर्संना उच्च दर्जाचे व्हिडिओ, अल्ट्रा हाय रिझोल्यूशन व्हिडिओ कॉलिंग आणि इतर अनेक फायद्यांचा अनुभव घेता येणार आहे. 5G नेटवर्कमुळे इंटरनेटच्या स्लो स्पीडपासून यूजर्संची सुटका तर होईलच, पण तंत्रज्ञानाचे अनेक नवे मार्ग आपल्यासाठी खुले होतील. Metaverse सारखे नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे.

दरम्यान 5G नेटवर्क आणण्यासाठी आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल. मोठ्या शहरांमध्ये हे तंत्रज्ञान लवकरच उपलब्ध होणार आहे. पण गावं आणि खेडेगावातल्या यूजर्संना यांची आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी