तुमचा पासवर्ड काही सेकंदात ब्रेक करू शकतो AI, 'या' टिप्स फॉलो करा अन् सुरक्षित करा आपली माहिती

गेल्या काही दिवसांपासून Ai आणि Chatbot संदर्भात विविध अपडेट्स समोर येताना दिसत आहेत. आता वृत्त असं समोर आलं आहे की, Ai अवघ्या काही सेकंदांमध्ये तुमचा पासवर्ड ब्रेक करू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. जाणून घेऊयात याच संदर्भात....

Representative Image
प्रातिनिधिक फोटो   |  फोटो सौजन्य: BCCL

Artificial intelligence can crack your password quickly : ChatGBT च्या सुरुवातीसह Ai चा वापर सुद्धा वाढताना दिसत आहे. ही टेक्नोलॉजी जितकी लोकांना आवडत आहे तितकीच याच्या संदर्भात एक्सपर्ट्समध्ये चर्चा होताना दिसत आहे. Ai च्या मदतीने तुमचा पासवर्ड काही सेकंदांमध्ये क्रॅक केला जाऊ शकतो असं वृत्त समोर आलं आहे.

गेल्या काही महिन्यांत एआयचा वापर वेगाने वाढताना दिसत आहे. ChatGBT आणि इतर Ai टुल्स आल्याने याने आपली एक खास जागा बनवली आहे. सुरक्षा तज्ज्ञ Ai च्या वापरण्याच्या संदर्भात इशारा देत आहेत आणि हे सायबर सुरक्षेसाठी किती धोक्याचे असू शकते याच्या संदर्भात सांगत आहेत. आता एका नव्या अभ्यासातून हे समोर आले आहे की, एआय प्रत्यक्षात तुमचा पासवर्ड अगदी सहज क्रॅक करू शकतो.

हे पण वाचा : चेरी टोमॅटो, टेस्टच नाही आरोग्यासाठीही आहे एकदम बेस्ट

रिसर्चमधून मिळाली माहिती

होम सिक्युरिटी हीरोज च्या एका अभ्यासात समोर आले की, सर्वसामान्य पासवर्डमध्ये जवळपास 51 टक्के AI द्वारे एका मिनिटाहून कमी वेळेत क्रॅक केले जाऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त 65 टक्के सामान्य पासवर्ड एका तासाहून कमी वेळेत क्रॅक झाले. तर 81 टक्के पासवर्ड एका महिन्याहून कमी वेळेत क्रॅक झाले. फर्मने 1,56,80,000 पासवर्डच्या सूचीमधून चालण्यासाठी PassGAN नावाच्या AI पासवर्ड क्रॅकरचा उपयोग केला आणि त्यानंतर आपला निकाल जाहीर केला.

हे पण वाचा : काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय

पासवर्ड सुरक्षित कसा करावा?

अभ्यासानुसार, 18 हून अधिक अक्षरे असलेला पासवर्ड हा एआय पासवर्ड क्रॅकर विरुद्ध सुरक्षित असतो कारण, नंबर-ओनली पासवर्डला क्रॅक करण्यासाठी पासगॅनला कमीत कमी 10 महिने लागतात. अभ्यासात असेही समोर आले की, सिम्बॉल, संख्या, लहान अक्षरे आणि मोठी अक्षरे असलेला पासवर्ड क्रॅक करण्यासाठी 6 क्विटिलियन वर्ष लागू शकतात.

हे पण वाचा : अरेंज मॅरेज करण्यापूर्वी हे 7 प्रश्न नक्की विचारा

अगदी सहज क्रॅक होऊ शकतो पासवर्ड

सिक्युरिटी रिसर्च फर्मनुसार, पासवर्ड क्रॅक करण्यासाठी सर्वात सोपा पासवर्ड म्हणजे केवळ अंक असलेला. इतकेच नाही तर 10 अंकांचा पासवर्ड सुद्धा अगदी सहजपणे हॅक केला जाऊ शकतो.

रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, लहान अक्षरे असलेला पासवर्ड हॅक करण्यासाठी एक तासाहून कमी वेळ लागेल. तर दहा अक्षरे आणि अंक असा एकत्रित पासवर्ड क्रॅक करण्यासाठी चार आठवडे लागू शकतात. जर कुणी आपल्या पासवर्डमध्ये अक्षरे, सिम्बॉल आणि संख्या या सर्वांचा उपयोग करुन 10 कॅरेक्टरचा बनवत असेल तर तो मजबूत पासवर्ड असू शकतो. हा क्रॅक करण्यासाठी 5 वर्षे लागू शकतात.

हे पण वाचा : लग्न करण्याचे तोटे, वाचल्यावर म्हणाल काय खरे अन् काय खोटे

या गोष्टींची घ्या काळजी

कमीत कमी 15 कॅरेक्टर्सचा वापर करा
पासवर्डमध्ये कमीत कमी दोन अक्षरे (कॅपिटल आणि स्मॉल कॅप्स), संख्या आणि सिम्बॉलचा वापर करा.
स्पष्ट पासवर्ड पॅटर्न वापरणं टाळा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी