Airtel Prepaid Plan : Jio ला धोबी पछाड देण्यासाठी आला Airtel चा हा स्वस्त प्लॅन! पाहा 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह इतर फायदे

Airtel Plan : एअरटेल(Airtel) आणि जिओमध्ये (Jio) तर जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. आता जिओला मागे टाकण्यासाठी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त स्वस्त प्रीपेड प्लॅन (Airtel Prepaid Plan) लॉंच केला आहे. एअरटेलला हा स्वस्त धमाकेदार प्लॅन अगदी माफक किंमतीत आहे. हा प्लॅन फक्त 199 रुपयांच्या शुल्कामध्ये उपलब्ध आहे.

Airtel Plan
एअरटेल प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • एअरटेल आणि जिओमध्ये जोरदार स्पर्धा
  • एअरटेला नवा प्रीपेड प्लॅन
  • पाहा सुविधा आणि वैशिष्ट्ये

Airtel 199 Plan : नवी दिल्ली : देशातील दूरसंचार कंपन्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन प्रीपेड प्लॅन बाजारात आणत असतात. एअरटेल(Airtel) आणि जिओमध्ये (Jio) तर जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. आता जिओला मागे टाकण्यासाठी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त स्वस्त प्रीपेड प्लॅन (Airtel Prepaid Plan) लॉंच केला आहे. एअरटेलला हा स्वस्त धमाकेदार प्लॅन अगदी माफक किंमतीत आहे. हा प्लॅन फक्त 199 रुपयांच्या शुल्कामध्ये उपलब्ध आहे. या प्रीपेड प्लॅनचे फायदे काय आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, या प्लॅनबद्दल विस्ताराने जाणून घेऊया. (Airtel launches cheap prepaid plan of Rs 199, check details)

अधिक वाचा : Earthquake:देशात भूकंपाचे धक्के, दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

एअरटेल 199 प्लॅनची वैशिष्टये

एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी अतिशय स्वस्त प्रीपेड प्लॅन बाजारात आणला आहे. हा नवीन 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन एअरटेलच्या अधिकृत बेवसाइटवर म्हणजे airtel.in वर रिचार्जसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 3 जीबी हाय-स्पीड डेटा दिला जाईल. या डेटाशिवाय, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देण्यात येणार आहे. तुमच्या माहितीसाठी या प्लॅनमध्ये रोजचा एसएमएस मिळणार नाही. पण हा प्लॅन तुम्हाला एकूण 300 एसएमएसची सुविधा देईल. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या इतर फायद्यांविषयी जाणून घ्या.

अधिक वाचा :  Maharashtra Breaking news 09 November 2022 Latest Update: संजय राऊत यांना जामीन मंजूर

प्लॅनचा कालावधी आणि इतर फायदे

हा प्रीपेड प्लॅन मोफत अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि एसएमएस व्यतिरिक्त, एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांना विंक म्युझिक आणि मोफत हेलोट्यूनचा लाभ देखील देतो. या एअरटेल प्रीपेड प्लॅनसह, तुम्हाला कंपनीकडून 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.

अतिरिक्त शुल्क

या प्लॅनचे एक वैशिष्ट्ये म्हणजे डेटा संपल्यानंतर, प्रति एमबी 50 पैसे आकारले जातील. त्याशिवाय एसएमएसच्या सुविधेबाबत, तुम्ही या प्लॅनसह एका दिवसात जास्तीत जास्त 100 एसएमएस पाठवू शकता. एसएमएस कालबाह्य झाल्यानंतर, स्थानिक एसएमएससाठी 1 रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपयांचे शुल्क आकारले जातील.

अधिक वाचा  : ट्विटरनंतर फेसबुकमधून 11 हजार कर्मचाऱ्यांना काढले

जिओ 199 प्लॅन 

एअरटेलप्रमाणेच जिओचे देखील प्रीपेड प्लॅन आहेत. रिलायन्स जिओचा 199 रुपयांचा प्लॅन देखील आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटा दिला जातो. हा प्लान 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतो. शिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 34.5 GB हाय-स्पीड डेटा मिळेल.

यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जातात. दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये तुलना करता अर्थातच, 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओची व्हॅलिडिटी कमी आहे. मात्र या प्लॅनमध्ये अधिक डेटा मिळतो आहे. 

देशातील टेलिकॉम क्षेत्रात आता 5Gचे आगमन झाले आहे. त्यामुळे आगामी काळात स्वस्त आणि चांगल्या सेवेसंदर्भात या क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. जिओ आणि एअरटेल यांच्याकडे सर्वाधिक ग्राहक आहेत. त्यामुळे या दोन्ही कंपन्या एकमेकांना टक्कर देण्याच्या प्रयत्नात असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी