जगात पहिल्यांदाच अर्धा रोबो आणि अर्धा माणूस

टेक इट Easy
Updated Apr 03, 2021 | 19:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

ब्रिटनच्या एका शास्त्रज्ञाने मोटर न्यूरॉम नावाचा गंभीर आजार झाल्यानंतर स्वत:ला जगातील पहिला रोबोमॅन बनवले आहे. या आजारामुळे त्यांच्या मांसपेशी खराब झाल्या.

peter
जगात पहिल्यांदाच अर्धा रोबो आणि अर्धा माणूस, घ्या जाणून 

थोडं पण कामाचं

  • मांसपेशी नष्ट झाल्याचा हा आजार झाल्यानंतर ब्रिटीश शास्त्रज्ञाने स्वत:ला अर्धा रोबो बनवला.
  • रोबो बनवल्यानंतर सर्व कामे सोपी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे
  • मोटर न्यूरॉम नावाचा गंभीर आजार झाला होता

लंडन: ब्रिटनच्या एका शास्त्रज्ञाने मोटर न्यूरॉम नावाचा गंभीर आजार झाल्यानंतर स्वत:ला जगातील पहिला रोबो बनवला आहे. स्वत:ला त्याने रोबोमॅन बनवले आहे. या आजारामुळे त्यांच्या मांसपेशी नष्ट झाल्या होत्या. आता मशीनच्या मदतीने ते सर्व कामे सोप्या पद्धतीने करू शकतात. जी कामे चांगला माणूस करू शकतो ती सर्व कामे ते करतात. अर्धा रोबो आणि अर्धा माणूस असलेल्या या शास्त्रज्ञांचे नाव आहे ६२ वर्षीय डॉक्टर पीटर स्कॉट मॉर्गन. 

मांसपेशीच्या आजाराने बनवले रोबो

डॉक्टर पीटर स्कॉट मॉर्गन इंग्लंडच्या डेवोन येथे राहतात. त्यांना मोटर न्यूरॉम नावाचा गंभीर आजाराने घेरल्यानंतर त्यांनी विज्ञानालाही आव्हान देण्याचा निर्णय घेतला. २०१७मध्ये त्यांना पहिल्यांदा समजले की त्यांना हा गंभीर आजार झाला आहे. या कारणामुळे शरीराचे अनेक अवयव काम करणे बंद झाले होते. त्यानंतर त्यांनी रोबोटिक्सचा वापर करत जीवनाचा विस्तार केला. 

२०१९मध्ये स्वत:ला बनवले मशीन

डॉ. मॉर्गन आपल्या ६५ वर्षीय पार्टनर फ्रान्सिससोबत राहतात. त्यांनी सांगितले की नोव्हेंबर २०१९मध्ये त्यांनी स्वत:ला अर्धा माणूस आणि अर्धा रोबो बनवणे सुरू केले होते. यानंतर आजपर्यंत ते केवळ जिवंतच नाहीत तर आधीपेक्षाही संपन्न आहेत. त्यांचे म्हणणे आहे की जीवनात ज्ञान आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने अनेक बिघडलेल्या गोष्टी बदलता येतात. 

सायबोर्ग कॅरेक्टरमधून मिळाली प्रेरणा

सायबोर्ग हे एक सायन्स फिक्शन कॉमिक कॅरेक्टर आहे जो अर्धा माणूस आणि अर्धा मशीन आहे. अर्धा मशीन असूनही माझ्याकडे प्रेम आहे. मी मस्ती करतो, मला आशा आहे. माझ्याकडे स्वप्ने आहेत. तसेच माझ्याकडे उद्देश आहे. जर मला कोणी गेल्या चार वर्षातील चांगल्या गोष्टीबद्दलचे विचारले तर मी सांगेन की मी आजही जिवंत आहे. 

रोबो बनत असताना अनेक जोखीमा घेतल्या

या शास्त्रज्ञांना अर्धा रोबो बनवण्यासाठी अनेक जोखिमा घ्याव्या  लागल्या. आजारादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगणाऱ्या मांसपेशी नष्ट होऊ लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बॉडी लँग्वेज सांगण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला. 

व्हेंटिलेटरने घेतात श्वास

डॉ. स्कॉट मॉर्गनने केवळ आपल्या डोळ्यांचा वापर करून अनेक कंम्प्युटर्स नियंत्रितकरण्यास सक्षम अशी डोळ्यांची टेक्निक शोधून काढली आहे. ते व्हेंटिलेटरने श्वास घेतात. त्यांना रोबो म्हणून ट्रान्सफॉर्म करताना त्यांनी आपला आवाज गमावला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी