Amazon Prime Day Sale 2022: जवळपास अर्ध्या किंमतीला मिळतील स्मार्टफोन, 'या' मोबाइलवर असेल बंपर सूट

टेक इट Easy
पूजा विचारे
Updated Jul 22, 2022 | 12:51 IST

Amazon Prime Day 2022 Sale Discounts: कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, या सेलमध्ये मोबाइल फोन (Mobile Phones) , अॅक्सेसरीज (Accessories) यावर 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.

Amazon Prime Day Sale
अॅमेझॉन प्राइम डे सेल 
थोडं पण कामाचं
  • Amazon Prime Day 2022 Sale ची सुरूवात उद्यापासून म्हणजेच 23 जुलैपासून होत आहे.
  • हा सेल 24 जुलैपर्यंत असणार आहे.
  • हा सेल केवळ प्राईम मेंबर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नवी दिल्ली: Amazon Prime Day 2022 Sale: एक चांगली बातमी आहे. Amazon Prime Day 2022 Sale ची सुरूवात उद्यापासून म्हणजेच 23 जुलैपासून होत आहे. हा सेल 24 जुलैपर्यंत असणार आहे. म्हणजेच Amazon Prime Day सेल एक दिवसांचा असणार  आहे. हा सेल केवळ प्राईम मेंबर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, या सेलमध्ये मोबाइल फोन (Mobile Phones) , अॅक्सेसरीज (Accessories) यावर 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. 

याशिवाय Amazon Prime Day 2022 या सेलमध्ये एक्सचेंज डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआय हा पर्याय देखील दिला जाणार आहे. यासाठी कंपनीकडून ICICI Bank आणि स्टेट बँक ऑफ इंडियासोबत पार्टनरशिप करण्यात आली आहे. यासह यूजर्संना कार्ड किंवा EMI Transactions वर 10 क्क्यांपर्यंत सूट दिली जाईल.

अधिक वाचा-  गोल्डन बॉयची कमाल, नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये

Apple iPhone 13 जो 2021 मध्ये लॉन्च झाला आहे. हा आयफोन सेलमध्ये 66,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत विकण्यात येणार आहे. जुन्या आयफोन मॉडेल्सची देवाणघेवाण करून ग्राहक अतिरिक्त सवलतींचा लाभ घेऊ शकणार आहेत. यामध्ये अॅपलचा A15 Bionic चिपसेट देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE 2 5G

OnePlus Nord CE 2 5G मध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन फेब्रुवारीमध्ये 23,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. Amazon Prime Day 2022 सेलमध्ये हा फोन 22,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यावर खरेदीदारांना अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील दिली जाणार आहे. 

Samsung Galaxy M13

आताच नव्याने लॉन्च करण्यात आलेला Samsung Galaxy M13 वर Amazon प्राइम डे 2022 च्या सेलमध्ये डिस्काउंटवर मिळणार आहे. 2000 रुपयांच्या डिस्काउंटसह हा मोबाइल विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 9,999 रुपयांना खरेदी करू शकता.

अधिक वाचा-  भिवंडीत लगेचच बदलली निष्ठा, आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांची मोठी गर्दी, पण पाठ फिरताच...

Redmi Note 11

Redmi Note 11 फक्त  10,749 मध्ये साइटवर लिस्ट करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन याच वर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. Amazon च्या प्राइम डे सेलमध्ये तुम्ही क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह येणारा हा फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी