अमेझॉनवर गॅझेट्स खरेदीवर भरघोस डिस्काऊंट; ६९ रूपयांपासून सुरूवात

टेक इट Easy
Updated May 07, 2019 | 14:15 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

सध्या अमेझॉनवर समर सेल सुरू आहे. त्याचा आज शेवटचा दिवस असून, त्यात सेलमध्ये स्मार्टफोन, होम अप्लायंस, एक्सेसरीजवर बंपर डिस्काऊंट देण्यात आला आहे. हा सेल ४ मेपासून सुरू झाला असून, आज ७ मे रोजी शेवटचा दिवस आहे.

Amazon Summer sale last day today
अमेझॉनवर बंपर सेलचा आज शेवटचा दिवस  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : हल्ली तुमच्याकडे केवळ स्मार्टफोन असून उपयोग नाही. त्याच्या जोडीला तुमच्याकडे अनेक त्याचे अॅक्सेसरीज आणि इतर गॅझेट्स असावी लागतात. ही गॅझेट्स कुठं आणि कधी स्वस्त मिळतात याकडं सगळ्यांचं विशेषतः तरूणांचं लक्ष असतं. सध्या अमेझॉनवर समर सेल सुरू आहे. त्याचा आज शेवटचा दिवस असून, त्या सेलमध्ये स्मार्टफोन, होम अप्लायंस, एक्सेसरीजवर बंपर डिस्काऊंट देण्यात आला आहे. हा सेल ४ मे रोजीपासून सुरू झाला आहे. आज म्हणजेच ७ मे रोजी त्याचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनवर जवळपास ४० टक्के डिस्काऊंट देण्यात आला आहे. त्याचवेळी अॅक्सेसरीजवरही मोठ्या प्रमाणावर डिस्काऊंट आहे. या सेलमध्ये अगदी ६९ रूपयांपासून तुम्हाला प्रोडक्ट खरेदी करता येत आहेत.

जाणून घ्या कोणत्या गॅझेटवर किती डिस्काऊंट

  1. गिकी पबजी मोबाइल गेम कंट्रोलर : या सेलमध्ये तुम्ही गिकी पबजी मोबाइल गेम कंट्रोलर केवळ ६९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता. याची मूळ किंमत ३९९ रूपये आहे. हे प्रोडक्ट अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही प्रकारच्या डिव्हाइसमध्ये वापरता येऊ शकते.
  2. एव्ही मार्ट मायक्रो प्लाइस्टिक यूएसबी ओटीजी अडॉप्टर : हे प्रोडक्ट तुम्हाला ६९ रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. याची किंमत १८१ रूपये आहे. यूएसबी फ्लॅश ड्राइव्हच्या साह्याने तुम्ही डायरेक्ट मोबाईल ट्रान्सफर करू शकता.
  3. आयबॉल बी ९ इयरवियर रिंग डॉक : हे प्रोडक्ट तुम्ही ९९५ रूपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याची किंमत साधारण १८४५ रूपये आहे. हा एक ब्लूटूथ हँडसेट असून, एकदा चार्ज केल्यानंतर ९० तास चालू शकतो. तसेच त्याची रेंज १० मीटरपर्यंत आहे.
  4. फोन कॅमेरा लेन्स कॉम्बो:  बाजारात ९९९ रूपये किंमत असलेले हे प्रोडक्ट तुम्ही केवळ २५५ रूपयांत खरेदी करू शकता. या सेटमध्ये तुम्हाला वाइड अँगल लेन्स आणि फिश आय लेन्सही मिळेल. अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही प्रकारच्या डिव्हाइसमध्ये वापरता येऊ शकते.
  5. पोपिओ 2.4 : ही माइक्रो यूएसबी टो टाइप सी चार्जिंग केबल तुम्हांला केवल १४९ रूपयांत मिळत आहे. याची मूळ किंमत ५९९ रूपये आहे. याद्वारे यूएसबी आणि टाइप सी दोन्ही प्रकारचे डिव्हाइस चार्ज करता येऊ शकतात.
  6. क्लासिको माइक्रो यूएसबी टूः हा आठ पीन चार्जर तुम्हांला फक्त १७९ रूपयात मिळणार आहे. याची किंमत सुमारे तीन हजार रूपयांच्या आसपास आहे.
  7. वोसावो सेल्फी स्टिकः मिनी वायर कंट्रोल सेल्फी स्टिक तुम्हाला २५५ रूपयांत मिळेल, त्याची मूळ किंमत १२९९ रूपये आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
अमेझॉनवर गॅझेट्स खरेदीवर भरघोस डिस्काऊंट; ६९ रूपयांपासून सुरूवात Description: सध्या अमेझॉनवर समर सेल सुरू आहे. त्याचा आज शेवटचा दिवस असून, त्यात सेलमध्ये स्मार्टफोन, होम अप्लायंस, एक्सेसरीजवर बंपर डिस्काऊंट देण्यात आला आहे. हा सेल ४ मेपासून सुरू झाला असून, आज ७ मे रोजी शेवटचा दिवस आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola