OnePlus प्रेमींसाठी Amazonची खास ऑफर, जाणून घ्या कसा मिळवायचा डिस्काऊंट

टेक इट Easy
Updated Mar 17, 2023 | 15:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

OnePlus 10R 5G Price: ग्राहकांना Amazon वर OnePlus 10R 5G अवघ्या 23 हजार रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या मोठ्या डिस्काऊंटचा फायदा ग्राहकांना एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरसह मिळणार आहे. 

OnePlus 10R 5G
OnePlus प्रेमींसाठी Amazonची खास ऑफर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • OnePlus 10R 5G ची वैशिष्ट्ये. 
  • स्मार्टफोनमध्येही OnePlus 11R चे सर्व फीचर्स
  • डिस्काऊंट कसा मिळवता येईल 

OnePlus 10R 5G: चायनीज टेक कंपनी वनप्लसचे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे कंपनीही आपल्या पोर्टफोलियोमध्ये सतत नवनवीन फोन्सची भर टाकत असते. तसं पाहिलं तर इतर ब्रँडच्या तुलनेत वन प्लसच्या किंमती सामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. पण आता ग्राहकांना Amazon वर OnePlus 10R 5G अवघ्या 23 हजार रुपयांपर्यंत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या मोठ्या डिस्काऊंटचा फायदा ग्राहकांना एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरसह मिळणार आहे. 

वन प्लसने अलीकडेच OnePlus 10R चे नवे व्हर्जन OnePlus 11R लॉंच केला आहे. यामुळे आता जुन्या व्हर्जनच्या किंमती कमी झाल्या आहेत. पण या डिस्काऊंटनंतर OnePlus 10R खरेदी करणं म्हणजे मोठ्या फायद्याचं गणित होऊ शकतं. कारण फिचर्स आणि कॅमेराच्याबाबतीत हा फोन जबरदस्त आहे यात कोणतीही शंका नाही. या डिव्हाइसला लेटेस्ट Android 13 वर आधारित OxygenOS 13 चे अपडेट मिळत आहे, यामुळे या स्मार्टफोनमध्येही OnePlus 11R चे सर्व फीचर्स मिळत आहेत. 

डिस्काऊंट कसा मिळवता येईल 

भारतीय बाजारपेठेत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह OnePlus 10R च्या बेस व्हेरिएंटची किंमत 38 हजार 999 रुपये आहे. पण Amazon वरील 10% डिस्काऊंट मिळाल्यानंतर हा फोन तुम्हाला 34 हजार 999 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. 

अधिक वाचा: iPhone 14 : खूश खबर, iPhone 14 मिळतोय एवढ्या किंमतीत बघा काय आहे ऑफर

इतकचं नाही तर OneCard क्रेडिट कार्डने EMI खरेदीवर 750 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सहा महिन्यांसाठी Spotify चे प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. 

OnePlus चे हे मॉडेल खरेदी करताना तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास, तुम्हाला स्वतंत्रपणे 18 हजार 050 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळू शकतो. (ही एक्सचेंज व्हॅल्यू जुन्या फोनचे मॉडेल आणि त्याची सध्याची स्थिती यावर अवलंबून असेल.)

अधिक वाचा: Holi : रंग खेळताना मोबाईल पाण्यात भिजला तर अशा प्रकारे सुरू करू शकाल

OnePlus 10R 5G ची वैशिष्ट्ये. 

OnePlus 10R 5G  फोनमध्ये ग्राहकांसाठी Forest Green आणि Sierra Black या दोन रंगांचे पर्याय 

गोरिल्ला ग्लास 5 च्या सिक्युरिटी आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले . 

Mediatek Dimensity 8100-Max प्रोसेसर

12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतचे UFS 3.1 इंटर्नल स्टोरेज 

Android 12 सह येत असलेल्या OnePlus 10R 5G ला Android 13 वर आधारित OxygenOS 13 चे अपडेट 

बॅक कॅमेरा पॅनेलवर 50MP मेन कॅमेरासह 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो सेन्सर कॅमेरा. 

अधिक वाचा: Mobile Phones : कोणत्या पॉकेटमध्ये ठेवला पाहिजे फोन? चुकीच्या खिशात ठेवल्यास होईल हे नुकसान

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी  16MP चा फ्रंट कॅमेरा

5000mAh क्षमतेची बॅटरी. 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट. केवळ 32 मिनिटांत शून्य ते 100% चार्ज होते, असा दावा कंपनीने केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी