तुम्हाला अॅप्स शेअर करण्यासाठी अँड्रॉईडच्या एअरड्रॉपसारखे ‘निअरबाय शेअर’चा नवा पर्याय

टेक इट Easy
Updated Feb 18, 2021 | 12:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

गेल्या वर्षी गूगलने त्यांच्या एअरड्रॉपसारख्या जवळच्या जवळ अॅप्स शेअर करू देणाऱ्या निअरबाय शेअरची फीचर्स अनेक महिने तपासल्यानंतर शेवटी ते उपलब्ध करून दिलं.

Nearby Share
तुम्हाला अॅप्स शेअर करण्यासाठी अँड्रॉईडच्या एअरड्रॉपसारखे ‘निअरबाय शेअर’ चालू  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • याआधीही अॅप्स शेअर करण्यासाठी होते हे पर्याय
  • प्लेस्टोअरमध्ये इनबिल्ट असल्यामुळे प्रक्रिया सोपी
  • कसे शेअर कराल या फीचरमधून अॅप्स?

गेल्या वर्षी गूगलने (Google) त्यांच्या एअरड्रॉपसारख्या (Airdrop) जवळच्या जवळ अॅप्स (applications) शेअर (sharing) करू देणाऱ्या निअरबाय शेअरची (Nearby Share) फीचर्स (features) अनेक महिने तपासल्यानंतर शेवटी ते उपलब्ध (available) करून दिलं. यातून फोटो (photos), व्हिडिओंसोबत (videos) लिंक्स (links) आणि अॅप्सही (apps) शेअर करता येतील. गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला निअरबाय शेअरच्या नव्या फीचसबद्दल चर्चा चालू झाली होती. या फीचरमुळे आता पूर्ण अॅप्स शेअर करता येणार आहेत. आता शेवटी हे अॅप प्लेस्टोअरवर (Play Store) उपलब्ध झाले आहे.

याआधीही अॅप्स शेअर करण्यासाठी होते हे पर्याय

या अॅपची घोषणा होण्याआधीही अॅप्स शेअर करण्यासाठी काही पर्याय होते. गूगलचे फाईल्स गो हे अॅप आपल्याला अॅप्स शेअर करू देते, पण त्यासाठी बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया करावी लागते. मात्र या नव्या यंत्रणेमुळे हे काम अधिक थेट आणि सहज होणार आहे, कारण हे थेट प्लेस्टोअरवरच आहे. यात ‘माय अॅप्स अँड गेम्स’ सेक्शनमध्ये एक नवा शेअरचा पर्याय दिसेल आणि आपल्याला फक्त अॅप सिलेक्ट करून ते शेअर करता येतील.

प्लेस्टोअरमध्ये इनबिल्ट असल्यामुळे प्रक्रिया सोपी

हा नवा पर्याय थेट प्लेस्टोअरमध्येच इनबिल्ट असल्यामुळे यूजर्सना अॅप बंडल्ससारख्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया कराव्या लागणार नाहीत किंवा इतर पद्धतींनी अॅप्स शेअर करावे लागणार नाहीत. किंवा साईडलोडिंगही करावे लागणार नाही. गूगलने डिसेंबरमध्ये सांगितले होते की येत्या काही आठवड्यात म्हणजे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीमध्ये ही नवी फीचर्स उपलब्ध होतील, पण या प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे हे फीचर आत्ता गूगलवर उपलब्ध होत आहे आणि याची उपलब्धताही मर्यादित आहे.

कसे शेअर कराल या फीचरमधून अॅप्स?

हे नवे फीचर वापरण्यासाठी सेंडर आणि रिसीव्हर अशा दोघांकडेही हे नवे फीचर अॅक्टिव्हेटेड असणे आवश्यक आहे. यानंतरची प्रक्रिया मात्र खूप सोपी आहे. एकदा ही प्रक्रिया चालू झाल्यानंतर ती प्रक्रिया बॅकग्राऊंडला चालू राहते आणि त्यानंतर यूजर्सनी संपर्कात रहाण्याची काही गरज नसते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी