Iphone in India : आयफोन 14 आता भारतात तयार होणार, चीनमधून ‘ॲपल’ घेतेय काढता पाय

चीनमध्ये वेगवेगळी संकटं येत असल्यामुळे आयफोन-14 चं उत्पादन आता भारतात करण्याचा निर्णय कंपनी घेत असल्याची माहिती आहे.

Iphone in India
आयफोन 14 आता भारतात तयार होणार  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • भारतात होणार आयफोन-14 चं उत्पादन
  • चीनमध्ये लॉकडाऊन असल्याने कंपनीचा निर्णय
  • भारताला होणार फायदा

Iphone in India : ॲपल कंपनीचा (Apple) नवा स्मार्टफोन (New Smartphone) सप्टेंबर महिन्यात लॉन्च (Launch in September) होणार आहे. या नव्या मॉडेलचं अधिकाधिक उत्पादन (Production) भारतात (India) घेण्याचा निर्णय ॲपल कंपनीने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमध्ये वारंवार सुरु असणारे लॉकडाऊन (Lockdown) आणि जिओ-पॉलिटिकल समस्यांमुळे (Jio Political issues) कंपनीने आपलं उत्पादन भारतातील प्लँट्समधून करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतात सुसज्ज असणाऱ्या प्रॉडक्शन लाईनचा वापर करून आपल्या स्मार्टफोनचं अधिकाधिक उत्पादन घेण्याची तयारी कंपनीने केली आहे. 

चीनमध्ये उत्पादन कमी

चीनमध्ये वारंवार येत असणाऱ्या संकटांमुळे कंपनीला अपेक्षित उत्पादन झालेलं नाही. वारंवार कोरोनाच्या लाटा येणं, त्यामुळे करावे लागणारे लॉकडाऊन आणि इतर काही जिओ-पॉलिटिकल समस्यांमुळे कंपनीला अपेक्षित असलेल्या प्रमाणात आयफोन मॉडेलचा पुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे अधिक प्रतीक्षा न करता हळूहळू चीनमधील उत्पादन कमी करण्याचा आणि भारतात उत्पादन वाढवण्याचा निर्णय कंपनी घेत असल्याची माहिती आहे. मात्र भारतात उत्पादन घेताना कंपनीसमोर काही आव्हानंदेखील आहेत. 

भारतात उत्पादन घेताना आव्हानं

प्रॉडक्शनची गोपनीयता आणि हाय स्टँडर्ड टिकवून ठेवणं हे एक मोठं आव्हान कंपनीसमोर असणार आहे. सूत्रांकडून मिळणाऱ्या बातमीनुसार या वर्षाच्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापर्यंत भारतात उत्पादित केलेले आयफोन कंपनीला मिळायला सुरुवात होऊ शकते. 

चीनऐवजी भारताला पसंती

गेल्या काही दिवसात अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत चालल्याचं चित्र आहे. शिवाय वारंवार पडणाऱ्या लॉकडाऊनचा सिलसिला कधी संपणार, याची काहीच शाश्वती देता येत नाही. त्यामुळे चीन आणि भारत यांच्यात आयफोनच्या उत्पादनात असणारा गॅप कमी करून दोन्हीकडून सारख्याच संख्येने स्मार्टफोन मॉडेलची निर्मिती करून घेण्याचा कंपनीचा मानस असल्याची माहिती आहे. 

अधिक वाचा - पृथ्वीसाठी धोक्याची घंटा? सूर्यावर रहस्यमय डागाचा आकार वेगाने वाढतोय, दोन दिवसांत 10 पटीने वाढला सनस्पॉट

यावेळी चार मॉडेल

सप्टेंबर महिन्यात कंपनीत आयफोन 14 चे चार वेगवेगळे मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये Iphone 14, Iphone 14 max, Iphone 14 Pro आणि Iphone 14 Pro Max यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक मॉडेलचे एक मिनी व्हर्जनही ॲपल कंपनीकडून तयार करण्यात येतं. मात्र यावेळी मिनी व्हर्जन येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याऐवजी Iphone 14 max हा व्हर्जन देण्यात आला आहे. 

जुने मॉडेल स्वस्त

जेव्हा जेव्हा नवा आयफोन बाजारात येतो, तेव्हा त्यापूर्वी आलेले मॉडेल स्वस्तात उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे आता आयफोन 12 आणि आयफोन 13 च्या किंमती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. अधिकृत ॲपलच्या वेबसाईटवर जरी किंमतीत फरक दिसत नसला, तरी अमेझॉन, फ्लिपकार्टसह अनेक ई-कॉमर्स वेबसाईटनी या मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत. आयफोन 14 प्रत्यक्ष लॉन्च झाल्यानंतर या किंमती अधिकच उतरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी