तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक आहात का?

टेक इट Easy
Updated Mar 03, 2021 | 17:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही स्कीम काढत असतात. अशाच प्रकारे Vodafone Ideaने आल्या ग्राहकांना खास रिचार्जवर हेल्थ इंश्युरन्स देण्याचा निर्णय घेतला आहे. 

vodafone-idea
तुम्ही व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक आहात का? 

थोडं पण कामाचं

  • न आयडियाने रिचार्जवर इंडस्ट्री फर्स्ट Vi हॉस्पिकेअर बाजारात आणले आहे.
  • कोरोना अथवा कोणत्याही पहिल्यापासून आजारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची सुविधा
  • आदित्य बिर्ला हेल्थ इंश्युरन्सच्या सहयोगाने व्ही हॉस्पिकेअरची ही खास ऑफर ग्राहकांना नक्कीच लाभदायक ठरेल असा आमचा प्रयत्न आहे.

मुंबई: व्होडाफोन आयडियाच्या प्रीपेड ग्राहकांसाठी खास गिफ्ट कंपनीने आणले आहे. जे ग्राहक ५१ आणि ३०१ रूपयांचे रिचार्ज करतात त्यांना फ्री आरोग्य सुविधा दिली जात आहे. यासाठी कंपनीने आदित्य बिर्ला हेल्थ इंश्युरन्ससोबत करार केला आहे. व्होडाफोन आयडियाने रिचार्जवर इंडस्ट्री फर्स्ट Vi हॉस्पिकेअर बाजारात आणले आहे. जे ग्राहक ५१ आणि ३०१ रूपयांचे रिचार्ज करतात त्यांना आदित्य बिर्ला हेल्थ इंश्युरन्स चिकित्स श्रमवर दिवसाला हॉस्पिटलच्या खर्चाचे एक हजार रूपये आणि आयसीयूच्या खर्चावर दोन हजार रूपये दर दिवसाला देणार  

व्ही हॉस्पिकेअर आहे खास 

व्हीआय प्रीपेड ग्राहकांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतरचे कव्हरमध्ये व्ही हॉस्पिकेअरकडून खास एक हजार रूपयांपर्यंतचे निश्चित कव्हर देण्यात आले आहे. रूग्णालयात दाखल होण्यासाठी आणख २४ तासांचा कालावधी आणि आयसीयू खर्चासाठी २ हजार रूपयांच्या कव्हरची सुविधा यात आहे. 

कोरोना अथवा कोणत्याही पहिल्यापासून आजारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची सुविधा. व्ही हॉस्पिकेअरच्या बंडल हेल्थ इंश्युरन्स प्रस्तावाला विविध मूल्य बिंदूंवर दोन रिचार्जसोबत मोठ्या संख्येने प्रीपेड ग्राहक याचा लाभ उचलू शकतात. 

व्हीए सीएमओचे म्हणणे आहे की ग्राहकांना यशस्वी होण्यासाठी त्यांना सशक्त बनवण्याचा हा प्रयत्न आहे. एक अब्जाहून अधिक भारतीय मोबाईल फोन वापरकर्त्यांच्या भविष्यासाठी हे आहे. आदित्य बिर्ला हेल्थ इंश्युरन्सच्या सहयोगाने व्ही हॉस्पिकेअरची ही खास ऑफर ग्राहकांना नक्कीच लाभदायक ठरेल असा आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आणि कल्याण हे व्होडाफोन आयडियाचे फोकस क्षेत्र आहेत. या करारासोबतच आम्ही आमच्या ग्राहकांना अचानकपणे येणाऱ्या आपात्कालीन हॉस्पिटलच्या आर्थिक ओजे कमी करण्यासाठी मदत करू. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी