First Iphone Auction : पहिल्यावहिल्या आयफोनचा लिलाव, इतक्या लाखांची लागली बोली

जगातील पहिल्या आणि दुर्मिळ उत्पादनाचं सर्वांनाच कौतुक असतं. अनेकांना प्रिय असणाऱ्या ॲपल कंपनीच्या पहिल्या आयफोनचा आणि पहिल्या आयपॅडचा नुकताच लिलाव झाला.

First Iphone Auction
पहिल्यावहिल्या आयफोनचा लिलाव  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • जगातील पहिल्या आयफोनचा लिलाव
  • पहिल्या आयपॅडचाही झाला लिलाव
  • लिलावात लागली अपेक्षेपेक्षा कमी बोली

First Iphone Auction : आयफोन (Iphone) आणि आयपॅड (Ipad) यांची बाजारातील किंमत (Market Value) किती असते, याची आपल्या सर्वांनाच कल्पना असेल. मात्र आपल्याला माहित असलेल्या किंमती (Prices) या सध्याच्या आणि गेल्या काही वर्षातील असतात. मात्र जेव्हा पहिला आयफोन बाजारात आला तेव्हा त्याची किंमत किती असेल आणि तो आयफोन जर आत्ता कुणाला विकत घ्यायचा असेल, तर त्याला काय किंमत मिळेल, असे प्रश्न विचारले तर मात्र त्याची उत्तरं पटकन देता येणार नाहीत. आयफोन हा मुळात लोकप्रिय ब्रँड असल्यामुळे या ब्रँडच्या पहिल्या मोबाईलला विशेष महत्त्व आहे. जेव्हा हा पहिला आयफोन तयार होऊन बाजारात आला होता, तेव्हा तो जसा पॅकबंद अवस्थेत बॉक्समध्ये होता, तसाच इतकी वर्ष ठेवण्यात आला होता. आता हा आयफोन विक्रीसाठी काढण्यात आला आणि त्याचा लिलाव (Auction) करण्यात आला. त्याचप्रमाणे पहिला आयपॅडदेखील विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. तोदेखील ऐतिहासिक पहिल्या बॅचचा असल्यामुळे त्याचाही लिलाव पार पडला. लाखो रुपयांना ही दोन्ही उत्पादनं विकली गेली. 

असा झाला लिलाव

अमेरिकेत एका ओपन न केलेल्या पहिल्या आयफोनची विक्री करण्यात आली आहे. यासाठी झालेल्या लिलावात या मोबाईलला 35,414 अमेरिकी डॉलर एवढी किंमत मिळाली. भारतीय चलनात ही किंमत होते साधारणपणे 28 लाख रुपये. तर पहिल्या जनरेशनचा आयपॅड विकला गेलाय 25 हजार डॉलर्सना. भारतीय चलनात याची किंमत होते सुमारे 20 लाख रुपये. हा आयपॅड 2001 साली लॉन्च करण्यात आला होता. 

अपेक्षेपेक्षा कमी किंमत

तसं पाहता, पहिल्या आयफोनला जेवढी जोरदार बोली लागणं अपेक्षित होतं, तेवढी ती लागली नाही. वास्तविक, पहिल्या आयफोनला लाखो डॉलर्सची बोली लागेल, अशी लिलावकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र काही हजारांतच ही बोली आटोपली. या बॉक्समध्ये आयफोन हँडसेटसोबत इतरही काही गोष्टी होत्या. 

काय होतं बॉक्समध्ये

लिलाव झालेल्या आयफोनच्या पहिल्या बॉक्समध्ये Apple 1 चा सर्किट बॉक्सही होता. ॲपल कंपनीचे को-फाउंडर Stephen Wozniak यांनी स्वतः हा सर्किट बॉक्स तयार केला होता. या सर्किट बॉक्सला लिलावात 6,77,196 डॉलर म्हणजेच अंदाजे 5.41 कोटी रुपये मिळाले. पहिल्या आयफोनमध्ये 2MP कॅमेरा बसवण्यात आला होता. 

अधिक वाचा - स्वस्तात मस्त… जबरदस्त मायलेज देणाऱ्या Bajaj CT 125X ची किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क

2007 साली झाला होता लॉन्च

पहिला आयफोन 2007 साली लॉन्च झाला होता. त्यावेळी 4GB व्हेरियंटची किंमत 499 डॉलर होती तर 8GB व्हेरियंटची किंमत 599 डॉलर होती. त्या मानाने आयफोनच्या लिलावात फार मोठा आकडा गाठला गेला नसला तरी पहिला आयफोन हे जगातील दुर्मिळ आणि मौल्यवान उत्पादन मानलं जातं. त्यात ते अनओपन्ड असल्यामुळे त्याचं मूल्य अधिकच असल्याचं मानलं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी