Free Ola Scooter : ओला स्कूटर मोफत मिळवण्याची संधी! भाविश अग्रवालने आणल्या आहेत जबरदस्त ऑफर्स, पाहा कशी

Bhavish Aggarwal Offer : ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric)सह-संस्थापक भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आले आहेत. या ऑफरद्वारे तुम्ही मोफत ओला स्कूटर (Ola Electric Scooter) घेऊ शकता. ओलाची केशरी रंगाची स्कूटर मोफत मिळवण्यासाठी दोन लोकांनी या ऑफरचा फायदा घेतला आहे. आता भाविशला इतर 10 ग्राहकांना मोफत ओला स्कूटर द्यायची आहे. यासाठी तुम्हाला एकच काम करावे लागेल.

 Free Ola Electric Scooter
मोफत ओला इलेक्ट्रिक स्कूटर 
थोडं पण कामाचं
  • ओला इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला मोफत मिळू शकते
  • ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric)सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर
  • भाविश अग्रवालने ट्विट करत दिली ऑफर

Ola Offers for free scooter : नवी दिल्ली: ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric)सह-संस्थापक भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आले आहेत. या ऑफरद्वारे तुम्ही मोफत ओला स्कूटर (Ola Electric Scooter)  घेऊ शकता. ओलाची केशरी रंगाची स्कूटर मोफत मिळवण्यासाठी दोन लोकांनी या ऑफरचा फायदा घेतला आहे. आता भाविशला इतर 10 ग्राहकांना मोफत ओला स्कूटर द्यायची आहे. यासाठी तुम्हाला एकच काम करावे लागेल. तुम्हाला तुमची स्कूटर एका चार्जमध्ये 200 किमी चालवावी लागेल. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला ओला स्कूटर मोफत मिळू शकते. भाविशने ट्विट करून ही माहिती दिली आहे. 21 मे पासून ओलाची खरेदी विंडो पुन्हा सुरू होत आहे. (Bhavish Aggarwal offering free Ola scooter, know what to do)

अधिक वाचा : Tata Nano EV नवा लूक, ॲडव्हान्स फीचर्सने लावणार मार्केटमध्ये आग, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

भाविशने केले हे ट्विट (Bhavish Aggarwal Tweet)

भाविशने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'लोकांचा उत्साह पाहता, एका चार्जवर 200 किमीचे अंतर पार करणाऱ्या आणखी 10 ग्राहकांना आम्ही मोफत केशरी स्कूटर देऊ! आमच्याकडे असे 2 ग्राहक आहेत ज्यांना हे करून मोफत स्कूटर मिळाल्या आहेत, एक ग्राहक MoveOS 2 आणि एक 1.0.16. स्कूटरवर हा पराक्रम केला आहे. त्यामुळे कोणीही टार्गेट पूर्ण करू शकतो! आम्ही विजेत्यांना जूनमध्ये त्यांच्या वितरणासाठी फ्युचरफॅक्टरीमध्ये आमंत्रित करू!'

अधिक वाचा : Best Selling Car | मारुती वॅगनआरने ह्युंदाई आणि टाटासह सर्व कंपन्यांना टाकले मागे, झाली सर्वाधिक विक्री, पाहा टॉप 20 कार

एका ग्राहकाने एका चार्जमध्ये 266 किमी चालवली

भाविशच्या या ट्विटनंतर, आणखी एका ग्राहकाने एका चार्जमध्ये 200+ किमीचा टप्पा पार केला आहे. पूर्वेश प्रभू नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने स्कूटरच्या डिजिटल मीटरचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि सांगितले की त्याने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत आणि ओला स्कूटरच्या सिंगल चार्जने 266 किलोमीटरचे अंतर कापले आहे. भाविशने हे ट्विट रिट्विट करत पूर्वेशचे अभिनंदन केले. तो म्हणाला की तू चॅम्पियन आहेस आणि मला खात्री आहे की तू लवकरच 300 चा टप्पा पार करशील.

अधिक वाचा : Maruti Suzuki | मारुतीच्या 'या' कारच्या प्रेमात पडले लोक...विक्रीत 1825% वाढ! किंमत 5.25 लाख आणि मायलेज 35 किमी

कंपनीने आणली नवीन ऑपरेटिंग सिस्टम

ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच आपल्या स्कूटरसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम MoveOS2 आणले आहे. स्कूटरबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारींनंतर कंपनीने ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च केली. स्कूटरला आग लागल्यानंतर कंपनीने 1,411 ओला स्कूटरही परत मागवल्या होत्या. तुम्हाला ओला स्कूटर घ्यायची असेल तर 21 मे पासून तुम्हाला संधी आहे. 21 मे पासून ओलाची खरेदी विंडो पुन्हा सुरू होत आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा हायपरचार्जर बॅटरीला फक्त १८ मिनिटात ० ते ५० टक्के चार्ज करतो. यामुळे ७५ किमीच्या हाफ सायकल रेंजसाठी ही इलेक्ट्रिक स्कूटर फिट बसणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवर कोणत्या शहरात चार्जर लावला जाणार आहे त्याची पूर्ण यादी देण्यात आली आहे. टियर १  आणि टियर २ची बहुतांश शहरे याच्या चार्जिंग नेटवर्कमध्ये कव्हर केले जाणार आहेत. हायपरचार्जर स्टेशनांवर मल्टीलेव्हर आउटलेट दिला जाणार आहे जेणेकरून एकाचवेळी अनेक ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी