BSNLचा जबरदस्त प्लान, कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटाचा मिळणार लाभ

BSNL prepaid plan: बीएसएनएलने 398 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लानची घोषणा केली आहे. या प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि डेटा बेनिफिट ऑफर करत आहे. 

BSNL
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने 398 रुपयांच्या नवीन प्रीपेड व्हाउचरची घोषणा केली आहे. या प्रीपेड प्लानमध्ये कंपनीकडून अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि इंटरनेट डेटाची सुविधा उपलब्ध करुन देते. म्हणजे या प्लानध्ये कुठल्याही प्रकारची FUP (फेअर युसेज पॉलिसी)ची मर्यादा नाहीये. म्हणजेच ग्राहक हवं तेवढं इंटरनेटचा वापर करु शकतात. यासोबतच संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्राहकांना 398 रुपयांच्या या प्रीपेड प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा आणि वॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. या प्लानची वैधता 30 दिवसांची असणार आहे.

बीएसएनएलच्या या प्लानमध्ये प्रीमियम नंबर्स, इंटरनॅशनल नंबर्सवर कॉल करण्यासाठी किंवा एसएमएससाठी स्टँडर्ड चार्जेस लागणार आहेत. बीएसएनएलने लॉन्च केलेला हा प्लान संपूर्ण देशभरातील टेलिकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. 

दररोज 100 SMS फ्री

या प्लानची वैधता 30 दिवसांची आहे आणि या कालावधीत एफयूपी लिमिटची चिंता न करता तुम्ही अनलिमिटेड डाऊनलोड्स आणि अपलोड्स करु शकतात. वॉईस कॉलिंग आणि डेटा बेनिफिट्सच्या व्यतिरिक्त ग्राहकांना दररोज 100 SMS फ्री मिळणार आहे. रोमिंग आणि दिल्ली, मुंबईतील एमटीएनएल नेटवर्कवर सुद्धा अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळणार आहे.

10 जानेवारीपासून 398 रुपयांच्या प्लानचा लाभ

398 रुपयांच्या प्लानचा लाभ बीएसएनएलचे युजर्स 10 जानेवारी 2021 पासून घेऊ शकतात. हा प्लान देशभरातील सर्व टेलिकॉम सर्किल्समध्ये उपलब्ध झाला आहे. यासोबतच बीएसएनएलने प्रजासत्ताक दिन आणि पोंगल निमित्त ग्राहकांसाठी 1999 रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता वाढवली आहे. कंपनीने 1999 रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता 21 दिवसांसाठी वाढवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी