सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, BSNL ने दिली 'ही' खास ऑफर

BSNL offer: भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने स्पेशल ऑफर्स देण्यास सुरुवात केली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बीएसएनएलने खास ऑफर उपलब्ध करुन दिली आहे. पाहूयात काय आहे ही ऑफर...

BSNL
प्रातिनिधीक फोटो 

मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ने देशातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी 10% सूट देणारी ऑफर उपलब्ध केली आहे. याची माहिती BSNL_Kolkata च्या ट्विटवरुन देण्यात आली आहे. टेलकॉमटॉक डॉट इन्फोच्या रोपोर्टनुसार, बीएसएनएल सेवेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना १० टक्क्यांपर्यंत बिलात सवलत देण्यात येणार आहे. बीएसएनएलचे हे एक चांगले पाऊल आहे कारण यामुळे ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल आणि बीएसएनएलला आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होईल. ही 10 टक्के सूट बीएसएनएलच्या लँडलाईन, ब्रॉडबँड आणि फायबर-टू-होम (FTTH) सेवांसाठी लागू असणार आहे.

टेलकॉमटॉक डॉट इन्फोच्या रिपोर्टनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बीएसएनएल कडून लागू करण्यात आलेली ही 10 टक्क्यांच्या सूटची ऑफर 1 फेब्रुवारी 2021 पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे. ही सूट केवळ कंपनीकडून लँडलाईन, ब्रॉडबँड आणि एफटीटीएच कनेक्शन सारख्या सेवा खरेदीसाठी लागू होईल. बीएसएनएल आधीच या सेवांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना बिलात 5% सवलत देत आहे. मात्र, आता ही सूट वाढवून 10% करण्यात आली आहे. 

सध्या सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही ऑफर लागू असणार आहे. या ऑफरचा लाभ 1 फेब्रुवारी 2021 पासून घेता येणार आहे. प्रमोशनल ऑफरचे नियम आणि अटी-शर्थी या पूर्वीप्रमाणेच म्हणजेच 5% सवलत असलेल्या ऑफर प्रमाणेच लागू असतील. बीएसएनलने घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनीच्या लँडलाईन, ब्रॉडबँड आणि FTTH सेवांमध्ये वाढ होईल.

गेल्यावर्षी दूरसंचार विभागाने प्रत्येक सरकारी विभागाला बीएसएनएल आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या सेवा ब्रॉडबँड, लँडलाईन गरजेसाठी अनिवार्य केले होते. म्हणजेच सार्वजनिक विभाग बीएसएनएल आणि एमटीएनएल व्यतिरिक्त अन्य दूरसंचार ऑपरेटर्सकडून सेवा घेऊ शकत नाहीत. 

बीएसएनएलने नुकतेच ब्रॉडबँड आणि भारत फायबर ग्राहसांसाठी एक ओवर-द-टॉप (ओटीटी) अॅड-ऑन पॅकची घोषणा केली होती. अॅड-ऑन पॅख 18 जानेवारी 2021 पासून लागू झाला आहे. याच्यामाध्यमातून यूजर्सला ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजेच Zee5 प्रीमियम, YuppTV लाईव्ह (सर्व NCF चॅनल), YuppTV FDFS (पहिला दिवस-पहिला शो, SonyLIV स्पेशल, Voot सिलेक्ट आणि YuppTV मूव्हिज यांचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये युजर्सला तीन महिन्यांसाठी 129 रुपये प्रति महिना आणि त्यानंतर 199 रुपये प्रति महिना या दराने युजर्सला अॅड-ऑन पॅक मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी