BSNL च्या 109 रुपयांच्या प्रीपेड प्लानवर डबल डेटा ऑफरसह अनलिमिटेड कॉलिंग

BSNL prepaid plan: सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लान उपलब्ध केला आहे. या प्लानची किंमत केवळ 109 रुपये इतकी आहे. जाणून घ्या कसा आहे हा प्लान.

BSNL
प्रातिनिधीक फोटो 

सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 109 रुपयांच्या प्रीपेड प्लानवर डबल डेटा ऑफर करत आहे. हा प्लान मिथराम प्लस (Mitharam Plus) नावाने आहे. बीएसएनएलचा हा प्लान वैधतेची मुदतवाढ करतो. हा प्लान अशा ग्राहकांसाठी आहे जे आपला प्रीपेड नंबर अॅक्टिव्ह ठेवण्याचा विचार करत आहेत.

बीएसएनएलने हा प्लान सर्वप्रथम डिसेंबर 2019 मध्ये सुरू केला होता. आतापर्यंत या प्लानमध्ये ग्राहकांना 20 दिवसांच्या वैधतेसह 5GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा होती. मात्र, आता नव्या प्लानमध्ये ग्राहकांना या प्लानमध्ये 10GB डेटा मिळणार आहे. मात्र, ही ऑफर 31 मार्च 2021 पर्यंतच वैध राहणार आहे. वास्तविक, मिथराम प्लस (Mitharam Plus) हा प्लान 1 एप्रिल पासून पूर्णपणे बंद करण्यास बीएसएनएलला सांगण्यात आले आहेत. तर यानंतर ग्राहकांना पीव्ही 106, पीव्ही 107 सारखे पर्याय निवडण्यास सांगितले जात आहे.

टेलिकॉमटॉक डॉट कॉमच्या मते, बीएसएनएलच्या 109 रुपयांच्या मिथराम प्लस प्रीपेड प्लान 10 दिवसांसाठी डेटासोबतच 20 दिवस FUP शिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देते. या प्लानची खास बाब म्हणजे 75 दिवसांची वैधता मिळणार आहे. हा प्लान अशा ग्राहकांसाठी आहे जे केवळ बीएसएनएलचा प्रीपेड नंबर अॅक्टिव्ह ठेवू इच्छित आहेत.

BSNLने आपला हा प्लान डिसेंबर 2019 मध्ये प्रति दिवस 250 मिनिट्स, 5GB डेटा आणि 90 दिवसांच्या वैधतेसह पुन्हा लॉन्च केला होता. यानंतर वैधतेत घट करुन 30 दिवसांची करण्यात आली होती. मिथराम प्लस प्रीपेड प्लान हटवण्यात आल्यावर बीएसएनएल युजर्स या रिचार्जवर अवलंबून न राहता त्यासारख्या प्राइस रेंजमधील इतर प्लान्स निवडू शकतात.

मिथराम प्लस प्लान बंद झाल्यावर युजर्स पीव्ही 106, पीव्ही 107 या प्लान्सने रिचार्ज करु शकतात. पीव्ही 106 प्लानमध्ये युजर्सला 3GB डेटा, 100 मिनिट्स वॉईस कॉलिंगसाठी, 60 दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून सब्सस्क्रिप्शन फ्री आणि 100 दिवसांची वैधता आहे. पीव्ही 106 आणि पीव्ही 107 हे दोन्ही प्लान्स केवळ वैधता वाढवण्यासाठी युजर्ससाठी लागू असणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी