एका मेसेजवर क्लिक करुन गमावले 2.5 लाख रुपये, चुकूनही करु नका 'असं'

टेक इट Easy
Updated Apr 16, 2019 | 14:59 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Online Shopping Fraud: दिल्लीमध्ये एका व्यक्तीने ऑनलाइन डीलच्या नादात आपले 2.5 लाख रुपये गमावले आहेत. अशा प्रकारचा गंडा तुम्हालाही लावला जावू शकतो. जाणून घ्या अशा फ्रॉडपासून कसे वाचाल.

delhi man losses 2.5 lakh rupees in online fraud
एका मेसेजवर क्लिक करुन गमावले 2.5 लाख रुपये  |  फोटो सौजन्य: Getty Images

नवी दिल्ली: दिल्लीतील एका व्यावसायिकाला ऑनलाईन पद्धतीने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. एका टोळक्याने व्यावसायिकाला 2.5 लाख रुपयांचा चुना लावला आहे. हॅकर्सने केवळ एका टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून हे कृत्य केलं आहे. नव्या ऑनलाईन शॉपिंग स्कीममध्ये हॅकर्स नागरिकांना मोठ-मोठ्या शॉपिंग डीलच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात अडकवता. पाहूयात नेमकं हॅकर्स कशा प्रकारे नागरिकांना लुबाडू शकतात.

झालं असं की, दिल्लीतील एक व्यावसायिक आपल्या ऑफिससाठी ई-कॉमर्स वेबसाईटवर फर्निचर शोधत होता. यानंतर या व्यावसायिकाला वेबसाईटवर एक आखर्षक डील दिसली. त्यानंतर त्याने विक्रेत्याचा फोन नंबर मिळवला आणि त्याच्यासोबत संपर्क केला. यावेळी विक्रेत्याने आपली ओळख एक निवृत्त सरंक्षण अधिकारी अशी केली.

मेसेजद्वारे गंडा

फ्रॉड विक्रेत्याने इतर विक्रेत्यांच्या तुलनेत खूपच कमी किमतीत त्या व्यावसायिकाला फर्निचर देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, यासाठी फ्रॉडने आधी पेमेंट मागितलं. यानंतर डील कन्फर्म झाल्यावर व्यावसायिकाच्या फोनवर एक मेसेज आला. मेसेजमध्ये अॅड यूपीआय मनी, सक्सेसफुल मनी ट्रान्सफर सारख्या पर्यायांसोबतच एका वेबसाईटची लिंक देण्यात आली होती.

या लिंकवर क्लिक करताच फ्रॉड व्यक्तीला पीडित व्यक्तीच्या फोनचा रिमोट अॅक्सेस मिळाला. या लिंकच्या माध्यमातून आरोपीने पीडित व्यक्तीचं बँक ट्रान्झॅक्शन, फोटो आणि मेसेज सर्वकाहीचा अॅक्सेस मिळाला. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आरोपीने यूआरएल एक डिकोड मेसेज शॉर्ट करुन पाठवली होती.

काय काळजी घ्याल?

अशा प्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत डील करताना काळजी घ्या. अशा प्रकारच्या डील्स संदर्भात पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्वाचं म्हणजे अशा कुठल्याही लिंकवर क्लिक करु नका जी तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून ई कॉमर्स डीलसाठी मिळते. कारण, अशा लिंकद्वारे हॅकर्स गंडा घालण्याचं प्रमाण अधिक असतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
एका मेसेजवर क्लिक करुन गमावले 2.5 लाख रुपये, चुकूनही करु नका 'असं' Description: Online Shopping Fraud: दिल्लीमध्ये एका व्यक्तीने ऑनलाइन डीलच्या नादात आपले 2.5 लाख रुपये गमावले आहेत. अशा प्रकारचा गंडा तुम्हालाही लावला जावू शकतो. जाणून घ्या अशा फ्रॉडपासून कसे वाचाल.
Loading...
Loading...
Loading...