जगभरात WhatsApp, Facebook, इंस्टाग्राम डाऊन

टेक इट Easy
Updated Jul 03, 2019 | 22:01 IST | टाइम्स नाऊ हिंदी

WhatsApp, Facebook down: भारतासोबतच जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं वृत्त समोर येत आहे. युजर्स या संबंधी ट्विटरवर तक्रारी करत आहेत.

Facebook down
फेसबुक  

नवी दिल्ली: भारतासह जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन झालं आहे. सोशल मीडियातील हे दिग्गज अॅप डाऊन झाल्याने युजर्सला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर युजर्स पोस्ट करु शकत नाहीयेत. तर काही पोस्ट केल्यास त्याचा फोटो फेसबुकवर दिसत नाहीये. काही युजर्सला फेसबुक, इंस्टाग्रामवर फोटो दिसत नाहीये तर काहींना पोस्ट करण्यात अडचणी येत आहेत. DownDetector च्या मते, ही समस्या युरोप आणि अमेरिकेत जास्त आहे.

बुधवारी दुपारपासून फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम डाऊन झालं असल्याच्या तक्रारी युजर्स ट्विटरवर करत आहेत. तांत्रिक समस्येमुळे असं झालं असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप फेसबुककडून यासंदर्भात कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये.

फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याने त्याचा फटका जगभरातील कोट्यावधी युजर्सला बसत आहे. त्याच्या तक्रारी ट्विटरवर युजर्स करत आहेत आणि त्यासोबतच ट्विटर युजर्स फनी मीम्सही पोस्ट करत आहेत.


यापूर्वीही झालं होतं फेसबुक डाऊन

तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम डाऊन झालं होतं. 14 एप्रिल रोजी सोशल मीडियातील हे अॅप डाऊन झाल्याने त्याचा फटका अनेक युजर्सला बसला होता. त्यावेळी काही युजर्सच्या मोबाइलवर फेसबुक सुरू होतं मात्र, डेस्कटॉप युजर्सला अडचणींचा सामना करावा लागत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
जगभरात WhatsApp, Facebook, इंस्टाग्राम डाऊन Description: WhatsApp, Facebook down: भारतासोबतच जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं वृत्त समोर येत आहे. युजर्स या संबंधी ट्विटरवर तक्रारी करत आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola