Vivo V23 5G Offer Price : विवोच्या रंग बदलणाऱ्या स्मार्टफोन V23 5G वर १३,०४० रुपयांची बंपर सूट

Vivo V23 5G | विवो वी २३ ५ जी नुकताच लाँच झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा पहिलाच रंग बदलणारा स्मार्टफोन आहे जो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा स्मार्टफोन सूर्यप्रकाशात येताच आपला रंग बदलतो आणि एकाच स्मार्टफोनमध्ये दोन भिन्न रंगांचा अनुभव घेण्याची संधी देतो.

Flipkart big offer of Rs 13,040 on Vivo color-changing smartphone V23 5G
विवोच्या रंग बदलणाऱ्या स्मार्टफोन V23 5G वर बंपर सूट   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विवो वी २३ ५ जी स्मार्टफोन नुकताच लाँच झाला आहे.
  • Vivo V23 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर २९९९० रूपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
  • विवो वी २३ स्मार्टफोनच्या खरेदीवर १६९५० रूपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे.

 Vivo V23 5G | नवी दिल्ली : विवो वी २३ ५ जी (Vivo V23 5G) नुकताच लाँच झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा पहिलाच रंग बदलणारा स्मार्टफोन (Smartphone) आहे जो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा स्मार्टफोन सूर्यप्रकाशात येताच आपला रंग बदलतो आणि एकाच स्मार्टफोनमध्ये दोन भिन्न रंगांचा अनुभव घेण्याची संधी देतो. (Flipkart big offer of Rs 13,040 on Vivo color-changing smartphone V23 5G). 

अनेकांनी हा स्मार्टफोन बुक केला आहे, त्यामुळे अनेक जण तो खरेदी करण्याचा निर्णय घेत आहेत. हा नवीन तंत्रज्ञानाचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल तर फ्लिपकार्टवर बंपर ऑफर देण्यात येत आहे. या ऑफरच्या मदतीने तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करून १० हजार रुपयांहून अधिक पैशांची बचत करू शकता. अनेक ग्राहकांना हि ऑफर आकर्षित करत आहे.

दरम्यान, Vivo V23 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर २९९९० रूपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनवर यापूर्वीत १४ टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच यावर बँक ऑफर देखील लागू असल्याने ग्राहक यावर अधिक बचत करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे जे ग्राहक एचडीएफसी (HDFC) बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरत आहेत त्यांना त्यावर १० टक्के अतिरिक्त सूट दिली जात आहे. ज्यामध्ये ग्राहक सुमारे २५०० रुपये वाचवू शकतात.

एक्सचेंज बोनसचा देखील समावेश 

यामधील सर्वात आकर्षित करणाऱ्या ऑफर बद्दल भाष्य करायचे झाले तर, विवो वी २३ (Vivo v23) स्मार्टफोनच्या खरेदीवर १६९५० रूपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. हा बोनस पूर्णपणे लागू केल्यास ग्राहक सुमारे १३०४० रुपयांची बचत करू शकतात. त्यामुळे तुम्हालाही मोठ्या डिस्काउंट ऑफर घ्यायच्या असतील तर तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता आणि या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता.

Vivo V23 5G स्मार्टफोनची माहिती 

Operating System MediaTek Dimensity 920
 डिस्प्ले     ६.४४ इंच (१६.३५ सेमी)
स्टोरेज    १२८ जीबी
कॅमेरा               ६४ MP + ८ MP + २ MP
बॅटरी               ४२०० mAh
भारतात किंमत २९९९० 
रॅम     8 जीबी 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी