WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या काय ते

टेक इट Easy
पूजा विचारे
Updated Mar 04, 2020 | 22:21 IST

WhatsApp यूजर्सला आता अॅन्ड्रॉईड आणि iOS मोबाइल फोनमध्ये डार्क मोडचं ऑप्शन दिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यूजर्स या फिचरची आतूरतेनं वाट पाहत होते. 

Whatsapp dark mode feature
WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या काय ते 

WhatsApp Dark Mode Feature: इंस्टंट मॅसेजिंग अॅप WhatsApp यूजर्संना आता अॅन्ड्रॉईड आणि iOS मोबाइल फोनमध्ये डार्क मोडचं ऑप्शन देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यूजर्स या फिचरची आतूरतेनं वाट बघत होते. तर काही महिन्यांपासून याची बीटा टेस्टिंग सुरू होती. आता यूजर आपलं व्हॉटसअॅप अपडेट करुन याचा वापर करु शकणार आहेत. 

डार्क मोड हे हेल्थच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. या मोडमध्ये चॅटिंगच्या दरम्यान डोळ्यांना कमी त्रास होतो. डार्क मोड स्क्रीनमधून निघणारी लाइट सुद्धा कमी करतो. या मोडचा वापर करत असताना बॅटरी सुद्धा कमी खर्च होते. जेव्हापासून हा फिचर आला आहे, यूजर्सनं याचा वापर करण्यास सुरू सुद्धा केलं. 

डार्क मोडबद्दल व्हॉटसअॅपचं म्हणणं आहे की, टेस्टिंग दरम्यान प्योर व्हाइट आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन डोळ्यांना त्रास देत होतं. यासाठी खास डार्क ग्रे बॅकग्राऊंड आणि ऑफ व्हाईट कलर आणण्याचा निर्णय घेतला गेला. डार्क मोडमध्ये चॅटिंग आधीच्या तुलनेत चांगला अनुभव देईल. 

डेस्कटॉपवर येणार पर्याय 

काही वेळापूर्वी व्हॉटसअॅपनं यूजर्सला मोबाइलवर डार्क मोड फिचर दिलं होत. जे सर्वांनी पसंत केलं. वृत्त समोर आलं होतं की, व्हॉटसअॅप डेस्कटॉपवर सुद्धा हे फिचर देणार आहे. येणाऱ्या काही दिवसांत हे फिचर यूजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर डेस्कटॉप वर मॅसेजिंगचा अनुभव खूपच वेगळा होईल. व्हॉटसअॅपशी निगडीत माहिती शेअर करणारं ट्विटर हँडल WABetaInfoनं डेस्कटॉप डार्क मोड फिचरचे काही फोटो लीक केलेत. 

व्हॉट्सअॅपचं डार्क मोड फिचर, असं करा अॅक्टिव्हेट

होम स्क्रिन आणि सेटिंग मेन्यूचा रंग सुद्धा गडद होतो, मात्र तुम्ही चॅटिंगबद्दल बोलत असाल तर यात केवळ चॅट बबल डार्क होतं. तर बॅकग्राऊंड आताही व्हाईटचं रिफ्लेक्ट होत आहे. यूजर्स आपल्या इच्छेनुसार कोणताही अन्य कलर निवडू शकतात. जो डार्क मोडमध्ये बॅकग्राऊंड रिफ्लेक्ट होईल. व्हॉट्सअॅपचं डार्क मोड बीटा टेस्टरसाठी उपलब्ध आहे.  WABetaInfo नुसार, डार्क मोड फिचर व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन  2.20.13 वर उपलब्ध होईल. तुम्ही गूगल प्लेच्या बीटा प्रोग्राममध्ये भाग घेऊन बीटा व्हर्जन डाऊनलोड करू शकता.  

How to enable Dark Mode in WhatsApp

व्हॉट्सअॅपमध्ये डार्क मोड ऑन करणं खूप सोपं आहे. यासाठी तुम्हाला केवळ काही स्टेप फॉलो करावे लागतील. खाली दिल्याप्रमाण स्टेप्स फॉलो करून तुम्ही व्हॉट्सअॅपवर डार्क मोड ऑन करू शकता. जो कमी प्रकाशात डोळ्यांसाठी चांगला असतो. 

STEP 1 WhatsApp ओपन करा

व्हॉट्सअॅप बीटाचं लेटेस्ट अपडेट डाऊनलोड करा आणि अॅप ओपन करा. 

STEP 2 सेटिंगसाठी पर्यायावर जा 

अॅप ओपन झाल्यानंतर तुम्हाला उजवीकडे दिसत असलेल्या तीन डॉटवर क्लिक करावं लागेल. जिथे तुम्हाला सेटिंगचा पर्याय दिसेल. सेटिंगच्या पर्यायावर क्लिक करा. 

STEP 3 थीमसाठी पर्यायावर क्लिक करा

येथे तुम्हाला बरेच पर्याय दिसतील. तुम्हाला चॅट्सवर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला थीमच्या पर्यायावर जावं लागेल. येथे क्लिक केल्यावर नवीन विंडो सुरू होईल. 

STEP 4 डार्क मोड ऑन करा

येथे तुम्हाला डार्क मोडच्या पर्यायाची निवड करावी लागेल. यावर क्लिक करताच डार्क मोड ऑन होईल.

STEP 5 सिस्टम डिफॉल्टच्या पर्यायावर क्लिक करा.

या अतिरिक्त तुम्ही सिस्टम डिफॉल्ट सेटिंगवर सुद्धा क्लिक करू शकता. ज्याच्या मदतीनं सिस्टम सेटिंगच्या नुसार डार्क आणि लाइट मोडमध्ये ऑटोमॅटिक बदल होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी