Google announce ban on apps: एक मोठी बातमी समोर आली आहे. गुगलने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन काही अॅप्स बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. या संदर्भात नुकतीच गुगलने घोषणा सुद्धा केली आहे. गुगलने एक नवीन फायनान्शियल सर्व्हिस पॉलिसी जाहीर केली आहे. ही पॉलिसी 31 मे 2023 पासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात येणार आहे.
अशा स्थितीत तुमच्या फोनमधील लेंडिंग अॅप्स आहेत ज्यामध्ये तुमचा पर्सनल डेटा असेल तो 31मे पूर्वी तुम्हाला डिलिट करावा लागेल किंवा सिक्युर्ड करावा लागेल. कारण, 31 मे नंतर तुमचा पर्सनल डेटा डिलीट करण्यात येईल. जाणून घ्या अखेर गुगलने हे पाऊल का उचललं आहे.
हे पण वाचा : कमी झोपणाऱ्यांनो सावधान..., आरोग्याला होऊ शकते मोठे नुकसान
ऑनलाईन माध्यमातून कर्ज देणाऱ्या अॅप्सवर फसवणूक करण्याचा वारंवार आरोप करण्यात येत आहे. यामुळेच केंद्र सरकारने सुद्धा कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कर्ज देणाऱ्या ऑनलाईन अॅप्सच्या माध्यमातून नागरिकांची पिळवणूक, छळ होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तसेच कर्ज देणाऱ्या अॅप्सवर युजर्सचा खासगी डेटा, कॉन्टॅक्ट्स, फोटो आणइ इतर माहिती चोरी करण्याचाही आरोप करण्यात आले आहेत. अशा स्थितीत गुगलने कर्ज देणाऱ्या अॅप्सवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा : लग्न करण्याचे तोटे, वाचल्यावर म्हणाल काय खरे अन् काय खोटे
गुगलकडून कर्ज देणाऱ्या या अॅप्सच्या संदर्भात पर्सनल लोन पॉलिसी अपडेट जारी केलं आहे. यानुसार प्ले स्टोअरवरुन उधार देणाऱ्या किंवा कर्ज देणाऱ्या अॅप्सवर निर्बंध लावण्यात येतील. ही पॉलिसी लागू झाल्यावर हे अॅप्स युजर्सचे फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट्स, लोकेशन आणि कॉल्स या सर्वांचा अॅक्सेस करता येणार नाही. या मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्यांनी तक्रारीत म्हटलं की, कर्जाच्या नावावर विनाकारण त्रास दिला जातो. आरोप आहे की, कर्जाची वसूली करण्यासाठी एजंट्स त्यांचे फोटो, कॉन्टॅक्ट्सचा चुकीचा वापर करतात.