Google: गुगलने यूजर्संना दिलं प्रचंड मोठं गिफ्ट!

Google Workspace च्या सर्व यूजर्संना 15GB ऐवजी 1TB सुरक्षित क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. खुद्द गुगलने ही माहिती दिली आहे.

google gave a gift to users now 1tb storage will be available instead of 15gb
Google: गुगलने यूजर्संना दिलं प्रचंड मोठं गिफ्ट! (फोटो सौजन्य: UnSplash) 
थोडं पण कामाचं
  • आता 15GB ऐवजी मिळेल 1TB स्टोरेज
  • गुगलकडून यूजर्संना दिलं गिफ्ट
  • 1TB सुरक्षित क्लाउड स्टोरेज मिळणार

Google Workspace​: कॅलिफोर्निया: Google ने आपल्या यूजर्संना एक मोठी भेट दिली आहे. वास्तविक, कंपनी वर्कस्पेस यूजर्ससाठी स्टोरेज क्षमता वाढवणार आहे. आगामी काळात, Google Workspace च्या प्रत्येक यूजर्सला त्यांच्या अकाउंटमध्ये 15GB ऐवजी 1TB सुरक्षित क्लाउड स्टोरेज मिळेल. Google Workspace हा अनेक अॅप्स आणि टूल्सचं कलेक्शन आहे. यामध्ये Gmail, Google Calendar, Google Drive, Google Docs Editors आणि Google Meet यांचा समावेश आहे.

यासाठी यूजर्सला कोणतीही सेटिंग करावी लागणार नाही. सर्व अकाउंट आपोआप 15GB स्टोरेजवरून 1TB वर शिफ्ट होतील. गुगलने एका ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिलेली आहे. कंपनीच्या ब्लॉग पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, वर्कस्पेस यूजर्ससाठी आणखीही काही फीचर्स हे  जारी केले जाणार आहेत.

Google Workspace पूर्वी GSuite म्हणून ओळखले जात असे. हा क्लाउड आधारित प्रोडक्टिव्हिटी संच आहे. यामुळे यूजर्संना  वापरकर्त्यांना कोणत्याही डिव्हाइसवर कुठूनही काम करता येणार आहे.

अधिक वाचा: WhatsApp Tips : WhatsApp Call Recording कशी करतात? जाणून घ्या खास टिप्स

जगभरातील 8 मिलियन यूजर्स हे Google Workspace साठी Google ला पैसे देतात. यापैकी 2 मिलियन यूजर्स हे गेल्या दोन वर्षांत सामील झाले आहेत. म्हणजेच, कोरोनामुळे जेव्हा वर्क फ्रॉम होममध्ये वाढ झाल्यानंतर गुगलच्या यूजर्समध्ये बरीच वाढ झाली.

Google Drive यूजर्सला 100 पेक्षा जास्त प्रकारच्या फाइल या Drive मध्ये स्टोर करण्याची परवानगी देतं. यामध्ये Microsoft Office च्या फाइल्स कन्व्हर्ट न करताही एडिट करता येणार आहेत. याव्यतिरिक्त, Google ड्राइव्ह मालवेअर, स्पॅम आणि रॅन्समवेअरपासून संरक्षण देखील मिळतं.

Google हे आता फिलीपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, तैवान, थायलंड, नेदरलँड्स, पोर्तुगाल, बेल्जियम, फिनलंड, ग्रीस आणि अर्जेंटिना यासह अनेक नवीन देश आणि प्रदेशांमध्ये वर्कस्पेस उपलब्ध करून देत आहे.

अधिक वाचा: What girls search on Google: मुली एकट्या असताना गुगलवर काय सर्च करतात? वाचा, रिपोर्टमधील नोंदी


 

Google वर चुकूनही सर्च करु नका या 3 गोष्टी

जर तुम्ही google वर चाइल्ड पॉर्नोग्राफी संबंधित काही सर्च कराल तर तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागू शकते. यासोबतच दंडही ठोठावला जाण्याची शक्यता आहे.

नवीन सिनेमा रिलीज होताच त्याची पायरेटेड कॉपी सुद्धा अनेकदा उपलब्ध होते. मात्र, सिनेमा पायरसी भारतात बॅन आहे. असे असताना सुद्धा अनेकजण या संदर्भात सर्च करतात. जर तुम्ही गुगलवर सिनेमा पायरसी संदर्भात काही सर्च करताना आढळून आले तर तुम्हाला मोठा दंड ठोठावला जाण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर जेलची हवा सुद्धा खावी लागू शकते.

अधिक वाचा: Digital gold vs Physical Gold: प्रत्यक्ष सोनं की डिजिटल सोनं? कुठली गुंतवणूक ठरते फायद्याची?

जर तुम्ही चुकून किंवा मजा-मस्ती म्हणून गुगलवर बॉम्ब बनवण्याची पद्धत सर्च केली तर हे नियमांचे उल्लंघन मानले जाते. जर तुम्ही असे करात तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. तसेच तुमच्यावर कठोर कारवाई सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे. तुम्ही गुगलवर अशा प्रकारचे काही सर्च केले तर तुमचा आयपी अ‍ॅड्रेस थेट सुरक्षा एजन्सीपर्यंत पोहोचतो. त्यानंतर सुरक्षा एजन्सी तुमच्याविरोधात कारवाई करू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी