Google Employees: गुगलने दिल्या कर्मचाऱ्यांना गाईडलाईन्स; कर्मचाऱ्यांमध्ये राजकीय चर्चेला बंदी

टेक इट Easy
Updated Aug 26, 2019 | 00:30 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Google Employees: गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याचे प्रथम कर्तव्य काय आहे? यापासून टाईमपास करण्यापर्यंतचे मुद्दे आहेत.

Guidelines for google employees
गुगलने दिल्या कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गुगलवर करण्यात आला पक्षपातीपणाचा आरोप; कंपनीने घेतली गंभीर दखल
  • कर्मचाऱ्यांसाठी दिल्या नव्या गाईड लाईन्स; तातडीने होणार कडक अंमलबजावणी
  • गुगलच्या ऑफिसमध्ये आता राजकारणावर चर्चा करता येणार नाही

Google Employees: गुगलचे कार्यालय आणि त्यात कर्मचाऱ्यांना असणाऱ्या सुविधा हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. त्यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या असतात, तर बऱ्याच अफवा असतात. गुगलने अनेकदा यावर खुलासेही केले आहेत. गुगलने नुकतीच कर्मचाऱ्यांसाठी एक गाईडलाईन दिली आहे. यामध्ये गुगलच्या कर्मचाऱ्यांनी करावयाच्या किंवा पाळायच्या गोष्टीही लिहिल्या आहेत. त्याचबरोबर ज्या गोष्टी करायच्या नाहीत, हे देखील लिहिले आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, कर्मचारी ऑफिसमध्ये राजकीय चर्चा किंवा वादविवाद करू शकणार नाहीत. गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याचे प्रथम कर्तव्य काय आहे? यापासून कामाच्या वेळेत टाईमपास करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या बाबींना या गाईडलाईन्समध्ये स्पर्श करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांना करून दिली जबाबदारीची जाणीव

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांची ज्या कामासाठी नेमणूक केली आहे. ते काम करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. आम्हाला इथे कामा व्यतिरिक्त इतर विषयांवर चर्चा करून वेळ दवडणे अपेक्षित नाही. त्यामुळे आता गुगलच्या कार्यालयात राजकीय विषयांवर चर्चा करणे शक्य नाही. कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारीचे काम करणे हे सगळ्यात महत्त्वाचे असल्याचे गुगलने म्हटले आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुगलसोबत काम करण्याची संधी ही अनेक आव्हाने पार केल्यानंतर येते. जगभरातील कोट्यवधी लोक आपल्यावर चांगल्या क्वालिटीच्या आणि विश्वासार्ह माहितीसाठी गुगलवरच विश्वास ठेवतात. आपण, या लोकांच्या विश्वासाचा सन्मान केला पाहिजे आणि आपले प्रोडक्ट्स आणि सेवा देणे अखंड सुरू ठेवले पाहिजे. गुगलने त्यांच्या कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी सांभाळण्याच्या सूचना केल्या आहेत. ब्लॉगमध्ये गुगलने म्हटले आहे की, तुम्ही जे काही व्यक्त करता त्याला एक अर्थ असतो. तुमच्या शब्दांमध्ये एक जबाबदारी असते आणि त्याला तुम्ही उत्तरदायी असता. त्याचबरोबर गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना ट्रोलिंगपासून सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. कोणालाही ट्रोल करू नका. कोणाचेही नाव घेऊ नका आणि एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करण्यात येत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जाहिराती किंवा मजकूराचा भाग होऊ नका.

आरोपाची गुगलने घेतली गंभीर दखल

त्याचबरोबर गुगल कंपनीशी निगडीत कोणत्याही अफवेला किंवा भ्रामक माहितीला पुष्टी देण्यास मनाई केली आहे. कंपनी संदर्भात चांगली माहितीच दिली पाहिजे. तुम्हाला सगळं काही माहिती आहे, असे समजू नका. गुगलच्या सेवा आणि प्रोडक्ट्स विषयी किंवा बिजनेसविषयी भ्रामक माहिती देऊ नका. काही दिवसांपूर्वी गुगलवर एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने पक्षपातीपणाचा आरोप केला होता. त्याची गुगलने गंभीर दखल घेतली आणि त्यानंतर तातडीने कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Google Employees: गुगलने दिल्या कर्मचाऱ्यांना गाईडलाईन्स; कर्मचाऱ्यांमध्ये राजकीय चर्चेला बंदी Description: Google Employees: गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. एखाद्या कर्मचाऱ्याचे प्रथम कर्तव्य काय आहे? यापासून टाईमपास करण्यापर्यंतचे मुद्दे आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola