गुगलने केला अनोख्या पद्धतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान

टेक इट Easy
Updated Sep 14, 2020 | 13:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

गूगलने म्हटले आहे की यावेळी संपूर्ण जग कोरोनाच्या या संकटाशी झुंज देत आहे. सोबतच हा धोकादायक संसर्ग रोखण्यासाठी लोक एकमेकांची मदतही करत आहे. हे संकट लवकरच दूर होईल अशी आशा आहे.

Doodle by Google
गुगलने केला अनोख्या पद्धतीने कोरोना योद्धांच्या सन्मान 

थोडं पण कामाचं

  • कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी बनवण्यात आले डूडल
  • डूडलद्वारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मानले आभार
  • भारतात कोरोना विषाणूबाबतची ताजी स्थिती

नवी दिल्ली: दिग्गज तंत्रज्ञान कंपनी गुगल (Technology giant Google) ही प्रत्येक खास दिवसासाठी डूडल तयार (makes Doodle for every special occasion) करते. या कडीत आज कंपनीने आणखी एक कडी जोडली (another Doodle added in the list) आहे आणि हे डूडल कोरोना योध्यांसाठी तयार करण्यात आले (special Doodle made in the honor of corona warriors) आहे. गुगलने हे डूडल कोरोनाविरुद्ध लढाईत प्राणपणाने लढणाऱ्या योध्यांना समर्पित (Google dedicates the new Doodle to all those warriors fighting against corona virus) केले आहे. यासोबतच याद्वारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही आभार मानले (Doodle thanks doctors and medical staff) आहेत. गुगलने सांगितले आहे की, यावेळी संपूर्ण जग कोरोनाच्या या संकटाशी झुंज देत (Google said that the whole world is fighting against corona) आहे. सोबतच हा धोकादायक संसर्ग रोखण्यासाठी लोक एकमेकांची मदतही करत (people helping each other to fight this virus) आहे. हे संकट लवकरच दूर होईल अशी आशा (hope that this pandemic will end soon) आहे.

कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी बनवण्यात आले डूडल

गुगलने ऑगस्ट महिन्यात आरोग्य मंत्रालयाशी भागीदारी करून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी एक खास डूडल तयार केले होते. यात मास्क घालण्याचा आणि शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. सोबतच यात कोरोनापासून बचावासाठीच्या उपायांची माहितीही देण्यात आली होती. या अॅनिमेटेड डूडलमध्ये प्रत्येक अक्षराला मास्कने कव्हर करण्यात आले होते आणि अॅनिमेशनच्या शेवटी सर्व अक्षरांना दूर दूर करून शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यासही सांगितले गेले होते.

याआधीही गुगलने डूडल तयार करून केली आहे कोरोनाबाबत जनजागृती

गुगलने याआधीही कोरोनाच्या संसर्गासंदर्भात अनेक डूडल्स बनवले आहेत. या सर्व डूडल्सद्वारे शिक्षक, अन्नसेवा पुरवणारे, पॅकिंग आणि शिपिंग उद्योगातील कर्मचारी आणि किराणामाल कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला होता. याशिवाय कंपनीने असेही एक डूडल तयार केले होते ज्यात कोरोनापासून बचावासाठी महत्वाचे उपाय सांगण्यात आले होते.

भारतात कोरोना विषाणूबाबतची ताजी स्थिती

भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४७,५४,३५६ इतकी झाली आहे. ९४,३७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत ३७,०२,५९५ लोक कोरोनामुक्त झाले आहेत तर गेल्या २४ तासांत १,११४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुक्त होण्याऱ्यांचे प्रमाण ७७.८८% इतके आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी