Google Play Store वरुन हटवण्यात आले हे 16 अ‍ॅप्स, पाहा संपूर्ण लिस्ट

Google Play Store वरुन 16 अ‍ॅप्स हटवण्यात आले आहेत. वाचा संपूर्ण लिस्ट आणि कोणते आहे ते अ‍ॅप्स...

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Google remove 16 apps from Google Play store: अँड्रॉईड फोन युजर्सला फोनमध्ये एखादे अ‍ॅप डाऊनलोड करायचे असेल तर ते Google Play store वरुन डाऊनलोड करावे लागते. मात्र, याच गुगल प्ले स्टोरवरुन 16 Apps काढून टाकण्यात आले आहेत. या अ‍ॅप्समुळे अँड्रॉईड डिव्हाईसची बॅटरी खूपच वेगाने डाऊन होत होती तसेच डेटा सुद्धा खूप जास्त वापरला जात होता. एका रिपोर्टनुसार, एका सिक्युरिटी फर्मने ओळखलेल्या अ‍ॅप्सवरील जाहिरातींवर युजरने एकदा क्लिक केल्यावर बॅकग्राऊंडमध्ये वेब पेज ओपन होऊन कथितपणे फसवणूक केल्याचा आरोप आहे. (google play store 16 apps remove from store read full list technology news in marathi)

Ars Technica च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, गुगलने आपल्या प्ले स्टोरवरुन 16 अ‍ॅप्स हटवण्यात आले आहेत. हे अ‍ॅप्स McAfree ने ओळखले आहेत. गुगल प्ले स्टोरवरुन हटवण्यात आलेले हे अ‍ॅप्स 'utility' अ‍ॅप्सच्या कॅटेगरीत येतात. McAfree नुसार, हे अ‍ॅप सामान्यपणे बेसिक गोष्टी करतात. म्हणजेच जेव्हा युजर्स QR कोड स्कॅन करेल आणि लिंक केलेल्या वेबसाईटला विझिट करणे, डिव्हाईसला फ्लॅशलाईट सुरू करणे, करन्सी कर्न्वर्ट करणे किंवा कॅलक्युलेट करणे. गुगल प्ले स्टोरवरुन हटवण्यात आलेल्या अ‍ॅप्सची यादी जाहीर.

हे पण वाचा : तीन पत्ती खेळताना कोणत्या राशीच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कसे असतात हावभाव

High-Speed Camera

Smart Task Manager

Flashlight+

com.smh.memocalendar memocalendar

8K-Dictionary

BusanBus

Flashlight+

Quick Note

Currency Converter

Joycode

EzDica

Instagram Profile Downloader

Ez Notes

com.candlencom.flashlite

com.doubleline.calcul

com.dev.imagevault Flashlight+

जेव्हा हे अ‍ॅप्स लॉन्च केले होते तेव्हा McAfree ला आढळून आले की, आपोआप कोड डाऊनलोड करण्यात येतात. युजर्सला न सांगताच वेब साईट्सपर्यंत पोहोचण्यासाठी सूचना प्राप्त करतील आणि त्यानंतर तेथील लिंक्स, जाहिरात यांच्यावर क्लिक करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी