Car: सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर सरकारला आली जाग

टेक इट Easy
रोहित गोळे
Updated Sep 21, 2022 | 14:24 IST

New Seat Belt Rules: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नियमांमध्ये बदल करण्यासाठी एक मसुदा प्रस्ताव तयार केला आहे. ज्या अंतर्गत कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

government will make changes after cyrus mistrys accident some big changes will happen in your car
Car: सायरस मिस्त्रीच्या अपघातानंतर सरकारला आली जाग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आता गाडीच्या मागच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट अलर्ट देण्याचीही व्यवस्था असणार आहे.
  • बेल्ट न लावल्यास व्हिडीओ आणि ऑडिओ मोडद्वारे अलर्ट दिला जाईल.
  • ड्रायव्हरला ओव्हर स्पीडचा इशाराही मिळेल.

New Seat Belt Rules: नवी दिल्ली: टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांचा एका भीषण अपघातात (Accident) मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिस्त्री 5 स्टार रेटिंग मिळालेल्या लक्झरी कार कंपनी मर्सिडीजच्या अशा मॉडेलमध्ये प्रवास करत होते. जी  अगदी सुरक्षित मानली जात होती. मात्र त्यानंतरही मिस्त्री यांच्या मृत्यूने कारच्या सेफ्टी फीचर्सवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिस्त्री मागच्या सीटवर बसले होते आणि त्यांनी सीट बेल्ट (Seat Belt) लावला नव्हता आणि हेच त्यांच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले. (government will make changes after cyrus mistrys accident some big changes will happen in your car)

मिस्त्री यांच्या मृत्यूपासून धडा घेत आता सरकार कार आणि इतर चारचाकी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहनांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करणार आहे.

अधिक वाचा: Automobile Update : या 'कार'ना आहे जबरदस्त डिमांड...ग्राहकांच्या मोठ्या वेटिंग

मंत्रालयाने जारी केली मसुदा अधिसूचना 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नियमांमध्ये बदल करण्यासाठी मसुदा प्रस्ताव तयार केला आहे. ज्या अंतर्गत कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याअंतर्गत अशा बदलांची तयारी सुरू आहे. ज्यामध्ये मागे बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधण्यात निष्काळजीपणा बाळगू नये. तसेच, सीट बेल्ट न घातल्यास जो बीप वाजतो तो वाजू नये म्हणून काही अनाठायी अशा क्लुप्ता देखील शोधून काढतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन नव्या व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. 

जेणेकरून मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनेही सीट बेल्ट लावावा. आणि सुरक्षित राहावं. नव्या प्रस्तावावर सरकारने लोकांकडून 5 ऑक्टोबरपर्यंत सूचना मागवल्या असून, त्यानंतर लवकरच अंतिम अधिसूचना जारी केली जाईल.

अधिक वाचा: Offers on cars : खूशखबर! 6 लाख रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या या विविध कारवर जबरदस्त ऑफर्स

केले जाणार हे मोठे बदल

  1. कार किंवा अन्य वाहनात सीट बेल्ट न लावल्यास, प्रवाशाला व्हिडीओ आणि ऑडिओ दोन्हीद्वारे सावध केले जाईल. याशिवाय गाडीची चावी लावल्यानंतर अलर्ट यंत्रणा कार्यान्वित होईल. त्याचप्रमाणे, वाहन चालवताना, ऑडिओ आणि व्हिडीओ मोडमध्ये प्रवाशाला इशारा दिला जाईल. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान कोणी सीट बेल्ट काढला तर अलार्म वाजेल.
  2. कार किंवा इतर चारचाकी वाहने अतिवेगाने चालवली तरी ओव्हर स्पीडचा इशारा दिला जाईल.
  3. सेंट्रल लॉक सिस्टीममुळे अनेकदा आग लागल्याचे आणि मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशावेळी प्रवाशांना मॅन्युअली लॉक उघडण्याचा पर्याय असेल.
  4. सीट बेल्ट किमान 100 मिमीने ताणणे अनिवार्य असेल.
  5. सर्व Front Facing सीटसाठी बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे.

अधिक वाचा: WhatsApp वापरतायं तर रहा सावधान !, Unknow number वरून शिक्षकाला कॉल आला, थोडा वेळ बोलणं होताच झाली फसवणूक ...

M, N आणि M 1 श्रेणी म्हणजे काय?

M आणि N श्रेणीच्या वाहनांमध्ये सीट बेल्ट अलार्म अनिवार्य असेल आणि एम 1 श्रेणीच्या वाहनांमध्ये चाइल्ड लॉकला परवानगी नाही. सर्व M, N श्रेणीतील वाहनांमध्ये रिव्हर्स अलार्म असणे आवश्यक आहे. किमान 4 चाके असलेली आणि प्रवासी किंवा मालवाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने M आणि N श्रेणीतील आहेत. त्याचप्रमाणे, M1 श्रेणीतील वाहने अशी आहेत ज्यात 8 पेक्षा जास्त सीट नाहीत.

अधिक वाचा: Jio Recharge: जिओचा धमाकेदार Recharge Plan, वर्षभरासाठी मिळवा अनलिमिटेड डेटा आणि फोन कॉल्स

एका वर्षात रस्ते अपघातात 1.55 लाख लोकांनी गमावला जीव

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, 2021 मध्ये भारतात रस्ते अपघातात सुमारे 1.55 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जो एका वर्षातील सर्वाधिक मृत्यूंचा आकडा आहे. 2021 मध्ये रस्ते अपघातात 3.71 लाख लोक जखमी झाले आहेत. या काळात 4 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले आहेत. जगाची आकडेवारी पाहिली तर भारताची स्थिती अधिक चिंताजनक दिसते. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

ja

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी