Engineers Day 2020: अभियंता दिनानिमित्त शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

टेक इट Easy
रोहित गोळे
Updated Sep 15, 2020 | 09:48 IST

Whatsapp Quotes on Engineers Day 2020: आज १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिवस आहे. त्यामुळे आपण आपल्या सर्व इंजिनिअर मित्रांना आणि गुरुजनांना इंजिनिअर दिनाच्या शुभेच्छा आणि पुढील मेसेज पाठवू शकतात.

engineers day
Engineers Day 2020: अभियंता दिनानिमित्त शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Twitter

Engineers Day 2020 whatsApp Marathi wishes and Messages: आज (१५ सप्टेंबर) रोजी भारतात इंजिनिअर दिन साजरा केला जातो. आधुनिक भारतात अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका निभावणारे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनानिमित्त अभियंता दिवस (Engineers Day) साजरा केला जातो  यानिमित्ताने आपण आपल्या इंजिनिअर मित्रांना नक्कीच शुभेच्छा द्या. तसेच आपल्या शिक्षकांचे आणि गुरुजनांचे स्मरण देखील यानिमित्ताने आपल्याला करता येईल.

भारतातील प्रख्यात इंजिनिअर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० साली झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती ही अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते. ज्यावेळेस संशोधनाची साधनं अत्यल्प होती त्यावेळी मोक्षगुंडम यांनी आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर अनेक नवनव्या गोष्टी तयार केल्या. त्याकाळी ते भारतातील अत्यंत हुशार आणि कल्पक असे इंजिनिअर म्हणून ओळखले जायचे. आपल्या अनेक कल्पक गोष्टी त्यांनी सत्यात उतरवून देशासाठी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी केलेल्या एकूण कार्याची भारत सरकारने देखील दखल घेत १९५५ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं.  

दरम्यान, यंदा कोरोना संसर्गामुळे अनेक कार्यालये आणि आणि महाविद्यालयं अद्यापही बंदच आहेत. दरवर्षी अनेक कार्यालयात आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. पण यंदा त्याच जल्लोषात हा दिवस साजरा करता येणार नाहीए. पण असं असलं तरीही या दिवसाचं महत्त्व अजिबात कमी होणार नाही. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा मित्रांना नक्कीच देऊ शकता. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (Engineers Day 2020 wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छांचे मेसेज शेअर करु शकतात.  

अभियंता दिनाच्या शुभेच्छा! 

(फोटो सौजन्य: Twitter @jitendra Awhad)

अभियंता दिवसाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा.. आपल्या मेहनत आणि कल्पक्तेमुळेच विश्व इतके आधुनिक आणि प्रगत होवू शकले. अर्थात सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ह्यांची आज जयंती. पूर येताच पाण्याच्या दाबाने दरवाजे उघडतील आणि ओसरताच पुन्हा पूर्ववत होतील अशी कल्पकता जगाला दिली.

Happy Engineers Day!

(फोटो सौजन्य: Twitter)

आधुनिक भारताचे विश्वकर्मा अशी ओळख असलेल्या भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी प्रणाम. त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Happy Engineers Day!

(फोटो सौजन्य: Twitter)

भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 

Happy Engineers Day!

(फोटो सौजन्य: Twitter)

आधुनिक भारताच्या नवनिर्माणात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रख्यात इंजिनिअर भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन. अभियंता दिनानिमित्त अभियंता आणि अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

Happy Engineers Day!

(फोटो सौजन्य: Twitter)

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारताचे महान अभियंता आणि राजकीय नेते होते. त्यांना १९५५ साली भारतातील सर्वोच्च असा भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारत त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा करतो. 

Happy Engineers Day! 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी