आठवड्याभरात PAN Card बनवून घरी, कुठे जायची गरज नाही, घर बसल्या करा Apply! 

टेक इट Easy
Updated Mar 31, 2023 | 13:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

 PAN Card बनवण्यासाठी तुम्हाला NSDL च्या अधिकृत साईट वर जावे लागेल. जिथे तुम्हाला खूप सारे पर्याय दिसून येतील.

PAN Card बनवण्यासाठी तुम्हाला NSDL च्या अधिकृत साईट वर जावे लागेल.
How To Apply New PAN Card  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • PAN Card Apply पॅन कार्ड अप्लाय करण्यासाठी NSDL च्या official site वर तुम्हाला जावे लागेल
  • जिथे तुम्हाला Apply PAN Card चा नवा पर्याय दिसून येईल.
  • पॅन कार्ड अर्ज करण्यासाठी 93 रुपये शुल्कसोबत 18 % कर, असे एकूण 105 रुपये शुल्क भरावी लागणार आहे,

PAN Card Apply पॅन कार्ड अप्लाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आम्ही एक सहज सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्याच्या सहाय्याने तुम्ही तूमचे PAN Card बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणाच्या मदतीची किंवा कुठे बाहेर जायची गरज नाही. आता तुम्ही विचार करत असाल की असे घरात बसून कसे काय PAN CARD बनवता येईल. तर तुमच्या या प्रश्नांचे उत्तर खाली आम्ही देत आहोत. How To Apply New PAN Card article  

अधिक वाचा : ​संभाजीनगर हादरले..., दोन गटात हाणामारी, दगडफेक आणि पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ

PAN Card बनवण्यासाठी तुम्हाला NSDL च्या अधिकृत साईट वर जावे लागेल. जिथे तुम्हाला खूप सारे पर्याय दिसून येतील. त्यामधील तुम्हाला Continue Application आणि Apply Online चे दोन पर्याय दिसून येतील. त्यामधील Apply Online वर तुम्हाला जायचे आहे आणि त्यामध्ये New PAN हा पर्याय असेल. नवीन PAN Card बनवण्यासाठी हाच पर्याय गरजेचा आहे. 

या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक पूर्ण फॉर्म निघेल. हा सर्व फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरावा लागेल. सर्व माहिती योग्य भरून झाल्यानंतर खाली  SUBMIT ऑप्शन दिसेल. पण लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड असेल तर तुम्ही त्यासाठी पुन्हा अर्ज करू शकत नाही. फक्त तेच वापरकर्ते ज्यांनी कधीही पॅन कार्ड बनवलेले नाही तेच हा पर्याय निवडू शकतात. तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्हाला हा पर्याय निवडावा लागणार नाही.

अधिक वाचा : ​कोकणवासियांसाठी खुशखबर !, बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा एक्सप्रेसचे काम डिसेंबरपर्यत होणार पूर्ण

पॅन कार्डकरिता अर्ज करण्यासाठी 93 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच 18 % कर देखील भरावा लागेल. म्हणजेच एकूण 105 रुपये शुल्क तुम्हाला इथे भरावी लागणार आहे, हे शुल्क भारतीय नागरिकांसाठी आहे. परदेशी नागरिकांना 864 रुपये भरावे लागतील, जीएसटीसह तेच शुल्क 1,020 रुपये इतके होते. यासोबतच तुम्हाला पॅन कार्ड बनवण्यासाठी अनिवार्य असलेली कागदपत्रेही सादर करावी लागतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी