Call Recording : तुमच्या मोबाईलमध्ये सहज करू शकता कॉल रेकॉर्डिंग, करा फक्त ही Setting

गुगलनं प्ले-स्टोअरवरून कॉल रेकॉर्डिंग करणारी ॲप (Call Recording App) काढून टाकली आहेत. मात्र तरीही तुम्ही तुमच्या अँड्रॉईड मोबाईलवर (Android Mobile Phone) कॉल रेकॉर्ड करू शकता. त्यासाठी सोपं सेटिंग करावं लागतं.

Call Recording
तुमच्या मोबाईलमध्ये सहज करू शकता कॉल रेकॉर्डिंग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गुगलकडून कॉल रेकॉर्डिंग ॲपवर बंदी
  • तरीही कॉल रेकॉर्ड करणं शक्य
  • मोबाईलमध्ये करावं लागेल सोपं सेटिंग

Call Recording : गेल्या मे महिन्यापासून गुगलनं कॉल रेकॉर्डिंग करणाऱ्या ॲप्सवर (Call recording apps) बंदी (Ban) घातली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता कुठलेही ॲप वापरून कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) करणं शक्य होणार नाही. पूर्वी जर तुम्ही कुठलेही थर्ड पार्टी ॲप (Third Party App) वापरून मोबाईल कॉलचं रेकॉर्डिंग करत असाल, तर आता ही सुविधा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना कॉल रेकॉर्ड कसे करावे, हा प्रश्न पडला आहे. थर्ड पार्टी ॲपवर गुगलने बंदी घातली असली तरी कॉल रेकॉर्डिंग करण्याची सुविधा अँड्रॉईड मोबाईल वापरणाऱ्यांसाठी अद्यापही उपलब्ध आहे. जर तुमच्या मोबाईलमध्येच कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असेल, तर मात्र तुम्हाला ती वापरता येऊ शकते. त्या सुविधेसाठी कॉल रेकॉर्डिंग ॲपवर घालण्यात आलेल्या बंदीचा कुठलाही परिणाम होणार नाही. 

प्रायव्हसी आणि सुरक्षेचा विचार

गुगलनं थर्ट पार्टी ॲप्लिकेशनवर कॉल रेकॉर्डिंग करायला बंदी घालण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. वापरकर्त्यांच्या सुरक्षेची काळजी आणि प्रायव्हसीची काळजी घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कॉल रेकॉर्डिंग करणाऱ्या सर्व ॲप्सना गुगलनं प्ले स्टोअरवरून काढून टाकलं आहे. अनेक ॲप्समधून युजर्सच्या खासगी डेटाची चोरी होत असल्याचं आणि ग्राहकांनी केलेल्या कॉल रेकॉर्डिंगचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन गुगलकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे Truecaller नेदेखील कॉल रेकॉर्डिंगची सुविधा आता बंद केली आहे. मात्र ज्या मोबाईल हँडसेटमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा अगोदरपासून उपलब्ध आहे, त्याच्यावर या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही. त्यासाठी मोबाईलमध्ये काही सोप्या सेटिंग्ज कराव्या लागतील आणि कॉल रेकॉर्डिंगची सुविधा तुम्ही वापरू शकाल. 

अधिक वाचा - 5G service cost: 5G सेवेसाठी किती पैसे मोजावे लागणार? कसा असेल तुमचा आवडता पॅक? वाचा..

असं करा सेटिंग

तीन प्रकारे कॉल रेकॉर्डिंगचं सेटिंग तुम्ही करू शकता. जर तुमच्या मोबाईलमध्ये Google Dialer दिला असेल तर त्यावरून कॉल करा. तिथं स्क्रीनवर तुम्हाला रेकॉर्डिंगचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकता. ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंगचा पर्यायही युजर्स वापरू शकतात. त्यासाठी तुम्हाला Always Record हा पर्याय निवडावा लागेल. त्यातून Numbers not in your contact हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करा. तर काही निवडक नंबरवरील कॉलच तुम्हाला रेकॉर्ड करायचे असतील तर Selected Numbers हा पर्याय निवडा. 

अधिक वाचा - Airtel Offer : एक वर्षापर्यत अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, ही आहे एअरटेलची सर्वात स्वस्त ऑफर, मिळेल डेटा, कॉलिंग आणि एसएमएस

तर हा पर्याय तुम्ही निवडत असाल तर नेमक्या कुठल्या नंबरवरून येणारे कॉल रेकॉर्ड करायचे आहेत ते नंबर निवडून यादीत टाकावे लागतील. त्यानंतर सहजपणे तुम्ही कॉल रेकॉर्डिंग सुविधेचा लाभ घेऊ शकाल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी