Setting on app : Truecaller वर तुमचं नाव दिसू नये असं वाटतं? त्यासाठी करा ही सोपी सेटिंग, वाचा पद्धत

Truecaller ॲपवरून जर तुम्हाला नाव काढून टाकायचं असेल तर ते सहज शक्य आहे. त्यासाठी काही सोपे सेटिंग करावे लागतील.

Setting on app
Truecaller वर तुमचं नाव दिसू नये असं वाटतं?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • Truecaller ॲपमुळे मिळते इतर कॉलर्सची माहिती
  • स्वतःचे नाव ॲपवरून काढणे शक्य
  • करावे लागतात सोपे सेटिंग

Setting on app : ट्रू कॉलर (Truecaller) हे नाव आता बहुतांश मोबाईल वापरणाऱ्यांना (Mobile users) माहित झालं असेल. आपल्याला येणारा एखादा फोन कॉल (Phone call) कुठून आला, कुणाच्या नावे तो नंबर आहे, तो बोगस नंबर आहे का यासारख्या बाबींची खातरजमा करण्यासाठी या ॲपचा (Mobile app) वापर करण्यात येतो. स्पॅम कॉल आणि अनोळखी नंबर यांची माहिती मिळवण्यासाठी या ॲपचा उपयोग होतो. टेलिफोन डिरेक्टरीप्रमाणं याचा वापर करता येऊ शकतो.

Truecaller चे फायदे

Truecaller मुळे अनोळखी नंबरवरून आलेल्या फोन नंबरसोबत तो नंबर ज्याच्या नावे नोंद आहे, त्याचं नावही आपल्या मोबाईलवर येतं. त्यासाठी प्रत्येक युजरला त्याचा नंबर हा त्या ॲपवर रजिस्टर करावा लागतो. या ॲपवर स्पॅम कॉलर्स आणि इतर कॉलर्सचा मोठा डेटाबेस उपलब्ध आहे. या टेडाबेसचा वापर युजर्ससाठी केला जातो आणि त्याचा फायदाही त्यांना होतो. या कंपनीकडून युजरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून कॉन्टॅक्ट डिटेल्स काढून ते क्लाऊडवर अपलोड केले जात असल्याचंही दिसून आलं आहे. मात्र अनेकांना आपलं नाव या यादीत असणं आवडत नाही. त्यासाठी त्यातून आपलं नाव वगळलं जावं, अशी त्यांची इच्छा असते. अर्थात, ही इच्छा पूर्ण होणं शक्य आहे. त्यासाठी काही मूलभूत सेटिंग करावी लागतात. जाणून घेऊया कशी करायची ही सेटिंग

अधिक वाचा - Motorola: विसरा 150MP कॅमेरा , Moto आणतोय तब्बल 200 MP कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन!

असं करा सेटिंग

सेटिंग करण्याची पद्धत फारच सोपी आहे. त्यासाठी ट्रू कॉलर ॲपमध्ये तुम्हाला जावं लागेल. त्यानंतर तुम्ही या ॲपमधून तुमचं नाव आणि नंबर कायमस्वरुपी डीलिट करू शकाल.

१. सर्वप्रथम ट्रू कॉलर ॲप ओपन करा.

२. यापूर्वी तुम्ही लॉगइन केलं नसेल तर ते करा

३. हॅमबर्गर आयकॉनवर जा. तिथे Setting हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

४. प्रायव्हसी सेंटर या पर्यायाची निवड करा

५. तिथे Deactivate हा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करा.

आयफोनसाठी वेगळं सेटिंग

वर सांगितलेलं सेटिंग हे अँड्रॉईड युजर्ससाठी आहे. जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर थोडी वेगळी पद्धत तुम्हाला वापरावी लागेल. 

१. ट्रू कॉलर ॲपवर जा

२. प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करा

३. सेटिंग या पर्यायावर क्लिक करा

४. प्रायव्हसी सेंटर पर्याय निवडा

५. Deactivate हा पर्याय क्लिक करा

अधिक वाचा - BGMI गेमसाठी मुलाने आईची केली हत्या, जाणून घ्या भारत सरकारने बंदी का घातली?

Cache करा क्लिअर

अनेकदा हे सेटिंग करूनही ट्रू कॉलरवरून आपलं नाव काढण्यात आलेलं नाही, असा अनुभव अनेकांना येतो. हा प्रकार Cache मेमरीमुळे घडतो. त्यासाठी वरील सेटिंग केल्यानंतर लगेचच Cache memory क्लिअर करा. त्यानंतर या ॲपमधून तुमचं नाव कायमस्वरुपी वगळलं जाईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी