WhatsAppवर डिलीट झालेले मेसेज असे करा रिस्टोर, जाणून घ्या पद्धत

टेक इट Easy
Updated Apr 08, 2021 | 16:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

WhatsApp दररोज मध्यरात्री २ वाजता डिफॉल्टपणे तुमच्या चॅटचा बॅकअप घेत असतो. 

whatsapp
WhatsAppवर डिलीट झालेले मेसेज असे करा रिस्टोरfvm  

थोडं पण कामाचं

  • जेव्हा आपण नवा स्मार्टफोन घेतो तेव्हा जुने व्हॉट्सअॅप टेक्स्ट, मीडिया फाईल्स आणि फोटोंचे अॅक्सेस गमावतो.
  • ही व्हॉट्सअॅपची कोणतीही अधिकृत सर्व्हिस नाही जे तुम्हाला डिलीट केलेले मेसेजेस वाचण्याची सर्व्हिस देते.
  • या अॅपच्या माध्यमातून तुम्ही डिलीट केलेले मेसेजस वाचू शकता

मुंबई: तुम्हाला  (WhatsApp) वर डिलीट झालेले मेसेज पुन्हा रिस्टोर करायचे आहेत का? आम्ही तुम्हाला यासाठी सोपी पद्धत सांगत आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही डिलीट झालेले मेसेजेस परत मिळवू शकता. दरम्यान, ही व्हॉट्सअॅपची कोणतीही अधिकृत सर्व्हिस नाही जे तुम्हाला डिलीट केलेले मेसेजेस वाचण्याची सर्व्हिस देते. ही एक थर्ड पार्टी अॅप आहे. याला WhatsRemoved+ म्हटले जाते. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही डिलीट केलेले मेसेजस वाचू शकता

जेव्हा आपण नवा स्मार्टफोन घेतो तेव्हा जुने व्हॉट्सअॅप टेक्स्ट, मीडिया फाईल्स आणि फोटोंचे अॅक्सेस गमावतो. जे अनेकदा निराशाजनक असते. मात्र आता तुम्हाला यापासून सुटका मिळणार आहे. यासाठी आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगत आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप चॅट गमावू शकत नाहीत. व्हॉट्सअप दररोज मध्यरात्री २ वाजता डिफॉल्ट पद्धतीने बॅकअप घेत असतो. 

फॉलो करा या स्टेप्स

चॅट बॅकअप चालू करण्यासाठी व्हॉट्सअॅप सुरू करा. सेटिंग्सवर जा, त्यानंतर चॅटवर जा, चॅट बॅकअपवर टॅप करा. 
तुम्ही नेव्हर, डेली, वीकली अथवा मंथली या ऑप्शनसह आपल्या चॅट बॅकअपची फ्रीक्वेंसी सेट करू शकता. अथवा तुम्ही मॅन्युअलीही करू शकता. 
याशिवाय जर तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोनचा वापर करा तर तुम्हाला गुगल अकाऊंट सिलेक्ट करावे लागेल. येथे तुम्ही बॅकअप स्टोर करू शकता.
iPhone यूजर्स, व्हॉट्सअॅप - चॅट्स-चॅट बॅकअपच्या आत सेटिंग्सवर जा, येथे तुम्ही ऑटो बॅकअप फ्रीक्वेंसी सिलेक्ट करू शकता.  

डिलीट झालेले मेसेज असे करा रिस्टोर

यासाठी व्हॉट्सअॅप अकाऊंट्च्या चॅट बॅकअप ऑप्शन डेलीवर सेट करणे गरजेचे आहे. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा याला रिस्टोर करणे सोपे असेल कारण नियमितपणे तुमच्या चॅटचा बॅकअप घेतला जाईल. नव्या स्मार्टफोनमध्ये स्विच करण्यास अथवा व्हॉट्सअॅप अकाऊंटला डिलीट करताना आम्ही अधिकतर डिलीट झालेले व्हॉट्सअॅप मेसेजेस रिकव्हर असते. एका नव्या स्मार्टफोनवर स्विच करताना आधी गुगल प्ले स्टोर अथवा अॅपल अॅप स्टोरवरून व्हॉट्सअॅप अॅप डाऊनलोड करावे लागेल. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी