How to start Dual WhatsApp Account in same mobile: सध्याच्या काळात आपल्यापैकी बहुतांश जणांकडे स्मार्टफोन आहेत आणि या स्मार्टफोनमध्ये दोन सिम कार्ड्स अनेकजण वापरतात. तसेच स्मार्टफोन युजर्सपैकी अनेकजण हे व्हॉट्सअपचाही वापर करत असतात. मात्र एकाच फोनमध्ये दोन्ही मोबाइल नंबरचे व्हॉट्सअप कसे सुरू करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर चिंता करु नका आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
व्हॉट्सअपकडून युजर्ससाठी अनेक नवनवीन फिचर्स लॉन्च करण्यात येत असतात. एकाच नंबरचं व्हॉट्सअप मोबाइल फोनसह इतर ठिकाणी वापरण्यासाठी कंपनीकडून फीचर लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानुसार तुम्ही मोबाइलसोबतच लॅपटॉपमध्येही व्हॉट्सअप वापरु शकता. मात्र, एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअप सुरू करायचे असतील तर नेमकं काय करावं? जाणून घेऊयात या संदर्भात...
हे पण वाचा : या आजारांमुळे वाढते पोटाची चरबी
स्मार्टफोन निर्माता ओप्पो (Oppo), शाओमी (Xiaomi), विवो (Vivo), हुआई (Huawei), सॅमसंग (Samsung), वनप्लस (Oneplus), रिअलमी (Realme) कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन्समध्ये ड्युअल अॅप्स (Dual Apps) सपोर्टची सुविधा दिलेली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही फोनमध्ये एकसारखेच दोन अॅप्स वापरु शकता. त्यामुळे थर्ड पार्टी अॅपशिवाय तुम्ही एकाच फोनमध्ये दोन व्हॉट्सअप सुरू करु शकता.
हे पण वाचा : Weight Loss: हा डाएट फॉलो करा अन् महिन्याभरात 10 किलो वजन कमी करा