Hyundai Electric Car: इलेक्ट्रिक कारसाठी हुंदाईने घेतला पुढाकार; पाहा भारतात कितीची गुंतवणूक करणार

टेक इट Easy
Updated Jul 22, 2019 | 23:55 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Hyundai Electric Car: हुंदाईच्या कोना इलेक्ट्रिक कारची किंमत २५ लाख रुपये आहे. त्यामुळे हुंदाईने आता कमी दरातील इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी केली आहे. त्या कारची किंमत सुमारे १० लाख रुपये असणार आहे.

Hyundai Electric car
हुंदाई कमी दरातील इलेक्ट्रिक कार लाँच करणार  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भारतात हुंदाई नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार
  • चेन्नईत दोन हजार कोटींची गुंतवणूक करणार
  • भारतातून कार निर्यात करण्याचे कंपनीचे नियोजन

नवी दिल्ली : भारतासारख्या लोकसंख्येचा विस्फोट झालेल्या देशात प्रदूषणाची समस्या जटील बनली आहे. राजधानी दिल्लीसारखे शहर जगातील प्रमूख प्रदूषित शहरांपैकी एक आहे. दिवसेंदिवस रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. लोकसंख्येचा परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर होत असून, त्या व्यवस्थेचाच बोजवारा उडाला आहे. परिणामी प्रत्येकजण आपली चारचाकी गाडी खरेदी करताना दिसत आहे. सरतेशेवटी याचा परिणाम प्रदूषण वाढण्यात होत आहे. प्रदूषणाचे दुष्परिणाम दिसू लागल्यामुळे आता, सरकारने आणि वाहन निर्मिती कंपन्यांनीच त्यावर उपाय-योजना करायला सुरुवात केली आहे. भारतात विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. टीव्हीएस कंपनीने नुकतीच इथेनॉलवर धावणारी बाईक तयारी केली आहे. तर, आता हुंदाईसारख्या कंपनीने त्यांची इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. हुंदाईच्या या कोना कारची किंमत २५ लाख रुपये आहे. एसयूव्ही मॉडेलची ही कार किंमत जास्त असल्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे मुश्कील आहे. त्यामुळे हुंदाईने आता कमी दरातील इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात कारची किंमत सुमारे दहा लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

भारतातून जगभरात कार निर्यात करणार

नव्या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी हुंदाईला भारतात गुंतवणूक करावी लागणार आहे. मुळाची दक्षिण कोरियाची असलेली ही कंपनी आता भारतात इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या जोरावर तामिळनाडूमध्ये चेन्नईत या कारचे मॉडेल डेव्हलप केले जाणार आहे. हा कार छोटी एसयूव्ही, प्रिमियम हॅचबॅक असू शकते. पण, या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हुंदाई कंपनी ही कार केवळ भारतातच नव्हे तर, लॅटिन अमेरिका, अफ्रिका, आखाती देश आणि आशियातील देशांमध्ये निर्यात करणार आहे. तज्ज्ञांच्या मतांनुसार हुंदाईने इलेक्ट्रिक कारला तयार करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला आहे. भारत सरकारही इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करत आहे. कारण त्यामुळे प्रदूषणाची समस्या दूर होणार आहे. या सगळ्या व्यवसाय संधी शोधणारी हुंदाई कंपनी भारतात इलेक्ट्रिक बॅटरीची सुविधा देण्याची योजना करत आहे.

कंपनीचा रिसर्च सुरूच

हुंदाई इंडियाचे एमडी सीएम किम यांनी सांगितले की, आम्ही भारतात नवीन प्रोडक्ट लाँच करण्यासाठी अभ्यास करत आहोत. हे प्रोडक्ट केवळ भारतासाठी डेडिकेटेड असणार आहे. हुंदाईने याच महिन्यात नवी कोना एसयूवी लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार २५ लाखा रुपयांना आहे. हु्ंदाई आपल्या इलेक्ट्रिक कारकडे ग्राहकाला आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे. पण, कोना कारची किंमतच इतकी आहे की, ती भारतात चालणे अवघड दिसत आहे. त्यामुळे नव्या कारसाठी कंपनी २ हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचे किम यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Hyundai Electric Car: इलेक्ट्रिक कारसाठी हुंदाईने घेतला पुढाकार; पाहा भारतात कितीची गुंतवणूक करणार Description: Hyundai Electric Car: हुंदाईच्या कोना इलेक्ट्रिक कारची किंमत २५ लाख रुपये आहे. त्यामुळे हुंदाईने आता कमी दरातील इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी केली आहे. त्या कारची किंमत सुमारे १० लाख रुपये असणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...