Online Shopping: बिनधास्त करा ऑनलाइन शॉपिंग, 'हे' अ‍ॅप्स देतील दुप्पट डिस्काउंट

टेक इट Easy
रोहित गोळे
Updated Sep 29, 2022 | 19:02 IST

Online Shopping: आजकाल बहुतेक लोक बाजारात जाणं टाळतात. अशा परिस्थितीत, लोक त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू ऑनलाइन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. असे काही अ‍ॅप्स आहेत ज्यामधून तुम्ही ऑनलाइन खरेदी करताना तुमचे बरेच पैसे वाचू शकता.

if you are going to do online shopping then pay attention to these apps will give you double discount
ऑनलाइन शॉपिंग करा बिनधास्त 'हे' अ‍ॅप्स तुम्हाला देतील दुप्पट डिस्काउंट  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पैसे वाचवण्यासाठी वेगवेगळ्या साइटवरील किमतींची तुलना करा
  • उत्पादन खरेदी करण्यासाठी रिव्ह्यू पाहा
  • मोबाइल रिचार्जमध्ये तुम्ही खूप पैसे वाचवू शकता

Online shopping: आजकाल बहुतेक लोक धकाधकीच्या जीवनात ऑनलाइन खरेदी (Online shopping) करणं पसंत करतात. ऑनलाइन शॉपिंग करण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामध्ये सध्या तुमच्याकडे भरपूर पर्याय आहेत. ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्ही किंमतीच्या बाबतीतही तुलना करू शकता आणि तुमचं बजेट लक्षात घेऊनच खरेदी करु शकता. तथापि, ऑनलाइन खरेदी करताना, अ‍ॅप किंवा वेबसाइटवर अधिक चांगली डील आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही काही वेबसाइट्सवर स्टॉक केले पाहिजे. यासाठी, आम्ही तुम्हाला अशा चार अ‍ॅप्सबद्दल (Apps) सांगणार आहोत, जे तुमचे खूप पैसे वाचवू शकतात. जाणून घ्या त्याबाबत सविस्तर- (if you are going to do online shopping then pay attention to these apps will give you double discount)

1. वूडू अ‍ॅप (Voodoo)

वूडू हे अ‍ॅप्लिकेशन नुकतेच लाँच करण्यात आले आहे. कोणत्या वेबसाइटवर कोणती वस्तू कोणत्या किंमतीला उपलब्ध आहे हे या अ‍ॅपवर पाहता येईल. तसेच, शॉपिंग करताना तुम्हाला नव-नवीन ऑफर आणि चांगल्या डील्सची माहिती देखील दिली जाते. तुम्ही येथे कॅब देखील बुक करू शकता. या अ‍ॅपवर कॅशबॅक कूपन देखील उपलब्ध आहेत. तुम्ही हे कूपन कोड टाकून बरीच सवलत मिळवू शकता.

अधिक वाचा: WhatsApp Video Call : आता व्हिडीओ कॉलिंग आणखी होणार सोपे, WhatsApp ने आणले नवीन फीचर

2. माय स्मार्ट प्राइज

या वेबसाइटवरून तुम्ही वेगवेगळ्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तूंच्या किंमतींची एकाच वेळी तुलना करू शकता. येथे एक खास कॅटेगरी देखील आहे, त्यानुसार तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू वेगवेगळ्या किमतींनुसार मिळू शकतात. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू ऑर्डर करू शकता.

3. प्राइज देखो

या अ‍ॅपवर किंमतींची तुलना करता येईल. या अ‍ॅपचा फायदा म्हणजे विशेष सवलत असताना तुम्हाला उत्पादनाशी संबंधित माहिती ही ई-मेलद्वारे मिळेल. यात 50 पेक्षा जास्त सब-कॅटेगरी आहेत. त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी शोधू शकता. यासह, आपण रिव्ह्यूच्या माध्यमातून देखील सर्वोत्तम डील निवडू शकता.

अधिक वाचा: Free Data : 50 जीबी डेटा मोफत देणारा जबरदस्त स्वस्त प्लॅन, इतरही सुविधा

4. ग्रॅब ऑन (www.grabon.in)

या अ‍ॅपद्वारे तुम्ही रिचार्जपासून ते ऑनलाइन तिकीट बुक करण्यापर्यंत सगळ्या गोष्टीवर सूट मिळवू शकता. या अ‍ॅपवर मोफत कूपन आहेत, ज्यातून तुम्हाला सूट मिळू शकते. यासाठी तुम्ही www.grabon.in ला भेट देताच तुम्हाला वेगवेगळ्या साइट्सवर मिळणाऱ्या सवलतींची माहिती मिळेल. उदाहरणार्थ, एका रिचार्जसाठी तुम्ही पेटीएमवरून 500 रुपयांच्या डीटीएच रिचार्जवर 10 ते 70 रुपये वाचवू शकता.

(टीप: या लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. तो व्यावसायिक सल्ला म्हणून समजू नये.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी